विशेष प्रतिनिधी/ लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात ४ कोटी वृक्षलागवड करण्याचा संकल्प सोडलेल्या वनखात्याने सात दिवसात तब्बल ५ कोटी ६ लाखांहून अधिक वृक्षारोपण करुन विक्रम केला आहे. एका आठवड्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण होण्याची ही पहिलीच वेळ आहे.वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गेल्यावर्षी १ कोटी वृक्षरोपणाचा संकल्प सोडला होता. प्रत्यक्षात १ कोटी २५ लाख वृक्षांची लागवड झाली. या उपक्रमाबद्दल वनमंत्री मुनगंटीवार यांना ‘लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’ पुरस्कार देण्यात आला होता. यावर्षी त्यांनी ४ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प सोडला होता. या उपक्रमाच्या पूर्वतयारीसाठी मुनगंटीवार १ जुलै ते ७ जुलै या काळात राज्यभर फिरले. ७ तारखेला सायंकाळपर्यंत राज्यात ५,०६,३९,१७६ एवढी विक्रमी वृक्षलागवड झाली, अशी माहिती वन विभागाचे सचिव विकास खारगे यांनी दिली.महाराष्ट्रात ३३ टक्के वनासाठी १ लाख चौ. कि.मी. क्षेत्राची गरज आहे. ५ कोटी वृक्षलागवडीमुळे यात मोठी भर पडली. सर्व स्तरातील व्यक्ती, सामाजिक, अध्यात्मिक-स्वयंसेवी संस्थाचे प्रतिनिधी, उद्योग, व्यावसायिक, सिने-नाट्य सेलिब्रिटीज, यांनी मिळून वृक्ष लागवडीचा लोकोत्सव साजरा केला. त्यामुळे हे शक्य झाल्याचे मुनगंटीवार यांनी ‘लोकमत’ला सांगितले.ग्रीन आर्मीचे सदस्यत्वग्रीन आर्मी अर्थात हरित सेना हा उपक्रम वनविभागाने सुरु केला आहे. हरितसेनेचे एक कोटी सदस्य करण्याचा वन विभागाचा मानस आहे. ॅ१ीील्लं१े८.ेंाँंङ्म१ी२३.ॅङ्म५.्रल्ल या वेबसाईटच्या माध्यमातून ग्रीन आर्मीचे सदस्यत्व कोणालाही घेता येईल. तसेच वृक्षतोड, वन्यजीवांची शिकार आणि वनविभागाशी संबंधित तक्रारींच्या अनुषंगाने ‘हॅलो फॉरेस्ट’ ही हेल्पलाईन सुरु करण्यात आली असून १९२६ हा या हेल्पलाईनचा क्रमांक आहे.राज्यातील जनतेच्या सहभागाशिवाय ही विक्रमी वृक्षलागवड अशक्य होती. . पुढील वर्षी १ ते १५ जुलै दरम्यान १३ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प आजच आपण जाहीर करत आहोत. येत्या तीन वर्षात ५० कोटी वृक्ष लागवडीचा शासनाचा संकल्प आहे.-सुधीर मुनगंटीवार, वनमंत्री
राज्यात विक्रम, लावले पाच कोटी वृक्ष !
By admin | Published: July 08, 2017 3:47 AM