मुंबई : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे देण्यात येणारा ‘चित्रभूषण’ पुरस्कार यंदा ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, भालचंद्र कुलकर्णी, ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी, सुषमा शिरोमणी, तसेच ज्येष्ठ कलादिग्दर्शक श्रीकांत धोंगडे व निर्माते किशोर मिस्कीन यांना जाहीर झाला आहे. शाल, श्रीफळ आणि ५१,००० हजार रुपये रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत सोमवारी, १९ आॅगस्टला रवींद्र नाट्य मंदिर येथे सायंकाळी ६ वाजता रंगणाऱ्या कार्यक्रमात करण्यात येईल.चित्रपट क्षेत्रात बहुमूल्य योगदान देणाºया मान्यवरांना देण्यात येणारे ‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार बुधवारी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे जाहीर करण्यात आले. नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी याची घोषणा व पुरस्काराची माहिती यावेळी दिली.रमेश साळगांवकर, संजीव नाईक, विलास उजवणे, अप्पा वढावकर, नरेंद्र पंडित, प्रशांत पाताडे, दीपक विरकूड, विलास रानडे, विनय मांडके, जयवंत राऊत, सतीश पुळेकर, प्रेमाकिरण, सविता मालपेकर, चेतन दळवी, अच्युत ठाकूर, वसंत इंगळे या कलाकर्मींना ‘चित्रकर्मी’ पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. शाल, श्रीफळ आणि ११ हजार रुपये रोख रक्कम असे देण्यात येणाºया या पुरस्काराचे स्वरूप आहे. या कार्यक्रमासाठी उदयोन्मुख कलाकारांना या वेळी सादरीकरणाची संधी मंडळातर्फे देण्यात येणार आहे.चित्रभूषण पुरस्कार (पुरुष विभाग)२०१५-२०१७भालचंद्र कुलकर्णी - अभिनेताविक्रम गोखले - अभिनेता/दिग्दर्शकश्रीकांत धोंगडे - कला - प्रसिद्धीकिशोर मिस्कीन - निर्माताचित्रभूषण पुरस्कार (स्त्री विभाग)२०१५-२०१७लीला गांधी - अभिनेत्री / नृत्यांगनासुषमा शिरोमणी - अभिनेत्री/ निर्मातीचित्रकर्मी पुरस्कार विजेते२०१५-२०१७रमेश साळगांवकर - दिग्दर्शकसंजीव नाईक - संकलक / निर्माता/ दिग्दर्शकविलास उजवणे - अभिनेताआप्पा वढावकर - संगीत संयोजकनरेंद्र पंडित - नृत्य दिग्दर्शकप्रशांत पाताडे - ध्वनिरेखनदीपक विरकूड + विलास रानडे - संकलकविनय मांडके - गायकजयवंत राऊत - छायाचित्रणसतीश पुळेकर - अभिनेताप्रेमाकिरण - अभिनेत्री / निर्मातीसविता मालपेकर - अभिनेत्रीचेतन दळवी - अभिनेताअच्युत ठाकूर - संगीतकारवसंत इंगळे - निर्मिती प्रबंधक /अभिनेता
विक्रम गोखले, भालचंद्र कुलकर्णी यांना ‘चित्रभूषण’
By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2019 3:42 AM