शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

विक्रांत केणे खून प्रकरण : नऊ जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2017 4:44 AM

शिवसेनेचे डोंबिवलीतील युवा अधिकारी विक्रांत केणे यांच्या हत्येप्रकरणी फरार असलेल्या काका श्रीराम आणि पुतण्या मंगेश भगत यांच्यासह

 लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : शिवसेनेचे डोंबिवलीतील युवा अधिकारी विक्रांत केणे यांच्या हत्येप्रकरणी फरार असलेल्या काका श्रीराम आणि पुतण्या मंगेश भगत यांच्यासह नऊ मारेकऱ्यांच्या खारघर भागातून कारसह मुसक्या आवळण्यात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले आहे. जमिनीच्या वादातून हा प्रकार घडला असून, यातील आणखी पाच जणांचा शोध सुरू असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. केणे कुटुंबीयांना श्रीराम भगत यांची डोंबिवलीतील आयरे गावातील जमीन विकत हवी होती. ती देण्यास भगत कुटुंबीयांचा विरोध होता. यातूनच उद्भवलेल्या वादातून विक्रांत यांचा मंगेशने श्रीरामच्या सांगण्यावरून रिव्हॉल्व्हरने गोळी झाडून खून केल्याची माहिती उघड झाली आहे. या प्रकरणी श्रीराम भगतसह नऊ जणांना एका कारसह अटक करण्यात आली आहे. श्रीराम भगत (४६), मंगेश भगत (२७), ओंकार भगत (२१), शुभम भगत (१९), पंकज म्हात्रे (२१), प्रदीप नायडू (२४), संजय तुळवे (२०), प्रशांत पवार (२०) आणि शशीकांत उर्फ शशी शांताराम कुळे (२४) रा. आयरे गाव, डोंबिवली अशी अटक केलेल्या कथित आरोपींची नावे आहेत. यापूर्वी यांच्यापैकी कोणावरही गुन्हा दाखल झालेला नाही. मारेकरी हे केणे कुटुंबीयांच्या शेजारीच राहत होते.भगत कुटुंबीयांना जमीन विकायची नसल्यामुळे ते आयरे गावातील त्या जागेवर बांधकाम करण्यासाठी जेसीबीने सफाई करीत होेते. त्याच वेळी ३० मे २०१७ रोजी दुपारी २ वा. च्या सुमारास श्रीराम यांनी त्या ठिकाणी उभा केलेला जेसीबी बाजूला घेण्यास सांगितल्याचा, तसेच दोन दिवसांपूर्वी झाडे तोडण्यावरून झालेल्या वादाचा राग मनात धरून, श्रीरामसह इतर १५ ते १६ जणांनी सचिन आणि विक्रांत केणे या दोघा भावांसह त्यांच्या नातेवाईकांना घेराव घातला. या धुमश्चक्रीत श्रीराम यांनी त्यांचे रिव्हॉल्व्हर काढून पुतण्या मंगेशकडे दिले. श्रीरामच्या इशाऱ्यावरूनच मंगेशने विक्रांतच्या पोटावर गोळीबार केला. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी डोंबिवली पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. डोंबिवली पोलिसांसह गुन्हे अन्वेषण विभागाकडूनही या प्रकरणाचा तपास सुरू असताना मारेकरी भगत कुटुंबीय हे गोव्यात पळून जाणार असल्याची पक्की माहिती सहायक पोलीस आयुक्त मुकुंद हातोटे यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे सोनसाखळी चोरी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक वाय. एस. चव्हाण यांच्या पथकाने, तळोजा रोड मुरबी गाव, कोपरा घरकूल येथे १ जून रोजी सापळा लावून, एका कारमधून सायंकाळी ७.१० वा. च्या सुमारास त्यांना पकडले. त्यांची कार खारघर रस्त्याने येत असताना दिसल्यानंतर, पोलिसांनी या कारला अडवून चौकशीअंती या नऊ जणांना अटक केली. या आरोपींना आता डोंबिवली पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.आणखी पाच जणांचा शोध सुरूया प्रकरणातील नऊ जणांचा शोध लागला असून, आणखी चार ते पाच फरार आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. घटनेनंतर ते शेजारच्या जिल्ह्यात पसार झाले होते. त्यांच्या गाडीच्या मागावरच पोलीस होते. अखेर गाडीसह त्यांना ताब्यात घेण्यात आले असून, हत्येसाठी वापरलेल्या मंगशचे परवाना असलेल्या रिव्हॉल्व्हरचाही शोध सुरू असल्याचे रानडे यांनी सांगितले.आता शस्त्र परवान्यांचा सर्व्हे करणारडोंबिवलीतील या घटनेमुळे आता शस्त्र परवाना असलेल्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवली भागातील वादग्रस्त परवानाधारकांचा सर्व्हे केला जाणार आहे. त्यातूनही आवश्यकता वाटल्यास संबंधितांच्या परवान्यांबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येणार असल्याचेही मकरंद रानडे यांनी स्पष्ट केले.