मुंबई : राज्यातील १६ जिल्ह्यांमधील ३ हजार १३१ ग्रामपंचायतींच्या थेट सरपंचपदासह सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल सोमवारी जाहीर झाले. त्यात बहुतांश ठिकाणी नव्या चेहºयांना सरपंच म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. प्रस्थापित कुटंबांतील उमेदवारांना गावकºयांनी सुट्टी दिली. निवडणूक पक्षीय चिन्हावर झाली नसली तरी अनेक ठिकाणी भाजपाने बाजी मारल्याचे चित्र आहे.मराठवाड्यात संमिश्र चित्र;निलंगेकर समर्थकांना धक्कालातूरचे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या मतदारसंघात त्यांच्या समर्थकांना काँग्रेसने धक्का दिला. तालुक्यात भाजपा (३५), काँग्रेस (२०), शिवसेना (२), अपक्ष (७) व राष्ट्रवादीचे (१) सरपंच विराजमान झाले. भाजपाने ५१, तर काँग्रेसने ४४ जागांचा दावा केला. बीड जिल्ह्यातील ६५५ ग्रामपंचायतींसाठी सरपंचाची निवड झाली. बीड विधानसभा मतदारसंघात विद्यमान आ. जयदत्त क्षीरसागर यांनी बाजी मारली. नवगण राजुरी येथे त्यांचा पुतण्या संदीप क्षीरसागर गटाचा सरपंच निवडून आला.परभणीतील १२६ ग्रामपंचायतींपैकी बहुतांश ठिकाणी सत्ताधाºयांच्या विरोधात कौल मिळाला. माजी खा. गणेश दुधगावकर यांना दुधगावमध्ये पुतण्या दिलीप यांच्या भाजपा पॅनलने धक्का दिला. नांदेड जिल्ह्यात स्थानिक आघाड्यांनाच मतदारांनी प्राधान्य दिले. मुखेडमध्ये १५ पैकी ११ ग्रामपंचायतींवर आमच्याच पक्षाचा झेंडा फडकला, असा दावा भाजपाने तर ४ ग्रामपंचायती मिळविल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. हिंगोलीत ४८ ग्रामपंचायतीत संमिश्र कौल मिळाला.जालना जिल्ह्यातील २२४ ठिकाणी संमिश्र निकाल आले. मांडव्यात भाजपाच्या चंदमामा यांचा शिवसेनेचे अॅड. मिसाळ यांनी पराभव केला. भोकरदनमध्ये अवघडराव सावंगी ग्रामपंचायत राष्ट्रवादीने भाजपाकडून खेचली. खा. रावसाहेब दानवे यांच्या जवखेडा बु. गावात भाजपाचेच तीन पॅनल होते. नवख्या उमेदवारांचा विजय झाला आहे.नगरमध्ये काँग्रेसचा दबदबा कायमअहमदनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात भाजपाने मुसंडी मारली. ५५ ग्रामपंचायतीमध्ये भाजपा, काँग्रेसचे ५४, राष्ट्रवादीचे ३५ शिवसेनेचे ९ ठिकाणी सरपंच निवडूण आले. नगर तालुक्यात सेनेने काँग्रेसशी हातमिळवणी करत १५ ग्रामपंचायतींवर ताबा मिळविला. राहुरीत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे व भाजपाचे आमदार शिवाजी कर्डिले यांचा गट वरचढ ठरला. त्यांनी सात ग्रामपंचायतींवर ताबा मिळविला. नेवासा येथे माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या क्रांतिकारी शेतकरी पक्षाने पाच ग्रामपंचायतींवर झेंडा फडकविला. स्थानिक आघाडी- गटाचे ५१ सरपंच निवडूण आले.गोपीनाथगड धनंजय मुंडेकडेगोपीनाथराव मुंडे यांचे समाधीस्थळ असलेल्या ‘गोपीनाथगड’ म्हणजे पांगरी येथे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या पॅनलने बाजी मारली. माजलगावचे माजी आमदार प्रकाश सोळंके यांनाही त्यांच्या मतदारसंघात विद्यमान आमदार आर.टी. देशमुख आणि मोहन जगताप यांच्या पॅनलने धक्का दिला. परळीमध्ये मंत्री पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी आपल्याच पक्षाकडे सर्वाधिक ग्रामपंचायती आल्याचा दावा केला.राज्यमंत्री दादा भुसे यांना धक्कानाशिक जिल्ह्यातील सरपंचांच्या १७१ जागांच्या निवडणुकीत बहुतेक ठिकाणी नवीन नेतृत्वाला संधी मिळाली आहे.मालेगाव तालुक्यात १५ वर्षांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या दाभाडी व सौंदाणे येथे भाजपाचे सरपंचपदाचे उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांना धक्का बसला. बहुतांश ठिकाणी स्थानिक आघाड्यांद्वारे लढत झाली. मालेगाव, येवला तालुक्यात भाजपाचा तर सिन्नर तालुक्यात शिवसेनेचा जोर आहे.धुळ्यात काँग्रेसची बाजी : खान्देशात जळगाव, नंदुरबारमध्ये भाजपाला यश मिळाले तर धुळ््यात काँग्रेसने बाजी मारली. जळगावमध्ये ११६ पैकी भाजपाचे ५७, शिवसेनेचे ३०, काँग्रेसचे ९, राष्ट्रवादी काँग्रेसचे १६ आणि संघटना/आघाडीचे ४ सरपंच झाले. धुळ््यात काँग्रेसचे ७१ ठिकाणी सरपंच झाले. त्यानंतर भाजपा (२२), शिवसेना (०९), राष्ट्रवादी काँग्रेसला (६) यश मिळाले. नंदुरबारमध्ये भाजपाचे ३०, काँग्रेसचे १७, शिवसेनेचे २ व भाकपाचा एका ठिकाणी सरपंच झाला.अकोल्यात युवकांना संधी : अकोला जिल्ह्यातील २७२ ग्रामपंचायतींमध्ये १७ सरपंच आणि ७७७ ग्रामपंचायत सदस्यांची अविरोध निवड झाली. सरपंचपदी यवुकांना संधी मिळाली. सेना, काँग्रेस, भारिप-बहुजन महासंघ यांनी सर्वाधिक ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा केला आहे.यवतमाळमध्ये भाजपाचजिल्ह्यात ९३ पैकी सर्वाधिक ४४ भाजपा पुरस्कृत सरपंच निवडून आले. काँग्रेसला १८, राष्टÑवादी काँग्रेस १२, शिवसेना १३ तर सहा सरपंचपद अपक्षांना मिळाले.
गावाचा कारभार नव्या चेह-यांकडे! प्रस्थापितांची सुट्टी; सरपंचपदाच्या निकालाचा कल भाजपाकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 3:42 AM