शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
3
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
4
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
5
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
6
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
7
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
8
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
9
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
10
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
11
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
12
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
13
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
14
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
15
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
16
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
17
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
18
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
19
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
20
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत

मातोळा गाव पडले ओस

By admin | Published: April 19, 2016 4:07 AM

तालुक्याच्या एका कोपऱ्यावर असलेले मातोळा हे गाव.पाण्याअभावी शिवार उघडा-बोडका झाला आणि मजुरांनाच काय शेतकऱ्यांनाही काम उरले नाही़

रमेश शिंदे, औसा (जि. लातूर)तालुक्याच्या एका कोपऱ्यावर असलेले मातोळा हे गाव.पाण्याअभावी शिवार उघडा-बोडका झाला आणि मजुरांनाच काय शेतकऱ्यांनाही काम उरले नाही़ अशा स्थितीत पोटापाण्यासाठी गेल्या तीन महिन्यांत मातोळ्यातील सुमारे अडीच हजार लोकांनी दुसऱ्या गावचा रस्ता धरला.तेरणा नदीवरील माकणीजवळ निम्न तेरणा प्रकल्पाच्या पायथ्याशी वसलेले मातोळा हे १० ते १२ हजार लोकसंख्येचे गाव़ नदीच्या काठावर असल्यामुळे जमिनीत जणू मोती पिकायचे. दोन-चार माळावरचे शेतकरी सोडले तर गावची शंभर टक्के शेती ओलिताखाली आली. त्यामुळे शेतीकामासाठी मजूर मिळेना, अशी एकेकाळी स्थिती होती. गावात ऊस वाहतूक करणाऱ्या किमान दोन गाड्या हंगाम संपेपर्यंत गावात राहायच्या. मात्र, मागील तीन ते चार वर्षांपासून या भागात पावसाचे प्रमाण कमी झाले़ परिणामी, तेरणाच्या तलावात पाणी आले नाही़ मातोळ्याची शेती उजाड झाली़ त्याचा फटका शेतकऱ्यांप्रमाणेच मजुरांनाही बसला़आता अनेकांनी गाव सोडल्याने करीमनगर झोपडपट्टी आणि वडार वस्ती यामध्ये फक्त वृद्ध आई-वडीलच पाहायला मिळतात़ बहुतांश तरुणांनी पत्नी, मुला-बाळांसह पोटाची खळगी भरण्यासाठी पुणे-मुंबई गाठले़ शेतकऱ्यांनी चारा पाण्याअभावी आपल्या गुराढोरांना बाजारचा रस्ता दाखविला़ आता जे काही मोठे शेतकरी आहेत; तेच गावात आहेत़ त्यांची अवस्था ‘गाव सोडताही येईना आणि राहताही येईना’ अशी झाली आहे़ ‘पूर्वी गावात कामे भरपूर होती़ शेतात काम नाही. आमची मुले कामाच्या शोधात पुण्या-मुंबईला गेली आहेत,’ असे शशिकांत चव्हाण याने सांगितले़ धुळे / अमरावती : सततच्या नापिकीस कंटाळून धुळे आणि अमरावतीतील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यापैकी एक महिला शेतकरी आहे. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पेरेजपूर येथील शेतकरी महिला रेखा भाऊसाहेब देवरे (४५) यांनी विष प्राशनाने मृत्यूला कवटाळले. त्यांचे पती भाऊसाहेब (४५) हे दिव्यांग असून त्यांना एक मुलगा (११), एक मुलगी (१९) आहे. त्यांना कर्जाचा भार असह्य झाला होता.तसेच कोरडवाहू शेतीत कापूस न झाल्याने व नंतर पेरलेल्या कांद्यालाही विहिरीतील पाणी अपुरे पडल्याने हताश झालेल्या अमरावतीमधील चांदूरबाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा येथील शेतकऱ्याने गुरुवारी विषारी औषध प्राशन केले होते. शेषराव मोतीराम पकळे (५५) असे त्याचे नाव असून, जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान शुक्रवारी त्याचामृत्यू झाला. (प्रतिनिधी)> च्औरंगाबाद : मद्यनिर्मिती उद्योगांचा पाणीपुरवठा बंद करून दुष्काळग्रस्तांनाते पाणी उपलब्ध करून द्यावे, या मागणीसाठी काँग्रेसच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयानजीक निदर्शने करण्यात आली. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आ. अब्दुल सत्तार व शहर काँग्रेसचे अध्यक्ष नामदेव पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या निदर्शनात कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागीझाले होते. च् ‘वाह रे मोदी, तेरी मनमानी... सस्ती दारू, महंगा पानी’, ‘हा लढा कशासाठी, घोटभर पाण्यासाठी’, ‘भाजपा सरकार म्हणतंय काय.... पाणी दारूला देऊ, प्यायला नाय’, ‘राज्यात संपूर्ण दारुबंदी झालीच पाहिजे’ अशा घोषणांनी दुपारी रणरणत्या उन्हात जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून गेला. आ. सत्तार व पवार यांच्यावर टाकण्यात आलेल्या नव्या जबाबदारीनंतरचे हे पहिलेच आंदोलन होते.>च्मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी, अल्पभूधारक तसेच शेतमजूर कुटुंबातील ५५१ जोडण्यांचा सामूहिक विवाह सोहळा २४ एप्रिलला परतूर (जि. जालना) येथे होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या वेळी प्रमुख पाहुणे असतील. लोणीकर हे या सोहळ्याचे आयोजक आहेत. नवदाम्पत्यास भेटवस्तूंबरोबरच त्यांच्या घरी शौचालय बांधून देण्यात येणार आहे. > २०० फुटांपेक्षा खोल बोअरवेल खोदण्यास सांगणारे, बोअर यंत्रधारक आणि चालकांवरही ही कारवाई केली जाणार आहे. राज्यात सध्या ४,३५६ टँकरद्वारे पाणी पुरविले जात आहे. त्यात कोकण विभागात ५२, नाशिक विभागात ८३१, पुणे विभागात ३०३, औरंगाबाद विभागात ३ हजार ३२, अमरावती विभागात १३१ तर नागपूर विभागात ७ टँकर्सने पाणीपुरवठा करण्यात येत आहे, अशी माहिती लोणीकर यांनी दिली. लातूर शहराला शाश्वत पाणीपुरवठा व्हावा यासाठी अटल अमृत योजनेतून ७०० कोटी रुपयांची योजना प्रस्तावित आहे, असे ते म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)मुंबई - २०० फुटांपेक्षा खोल बोअरवेल खोदल्यास महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) अधिनियमानुसार संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी आज मंत्रालयात आयोजित पत्रपरिषदेत ही माहिती दिली.