शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
2
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
3
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
4
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
5
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
6
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
7
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
8
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
9
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
10
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
11
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
12
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
13
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
14
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
16
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
17
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
18
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
19
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
20
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके

ग्रामीण विद्यार्थ्यांनी शोधला वीजचोरीवर उपाय

By admin | Published: May 04, 2016 9:52 PM

वीज चोरीची समस्या महावितरणपुढे डोकेदुखी ठरली आहे. त्याचा परिणाम केवळ महावितरणच्या महसुलावरच होत नाही, तर प्रामाणिक ग्राहकांनाही भुर्दंड सोसावा लागतो आहे

 ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि. 4- वीज चोरीची समस्या महावितरणपुढे डोकेदुखी ठरली आहे. त्याचा परिणाम केवळ महावितरणच्या महसुलावरच होत नाही, तर प्रामाणिक ग्राहकांनाही भुर्दंड सोसावा लागतो आहे. महावितरणला आजपर्यत ही समस्या सोडविता आली नाही.  महावितरणची ही डोकेदुखी संपविण्याचे तंत्र ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शोधले आहे. त्यांनी तयार केलेले स्मार्ट मीटर वीजचोरींवर अंकुश लावू शकतील असा दावा या विद्यार्थ्यांचा आहे. 

प्रफुल्ल पाटील, अक्षय आटे, प्रशांत कळंबे व मुजीब खान हे उमरेड तालुक्यातील पॉलिटेक्निकचे विद्यार्थी. घरच्या परिस्थितीशी दोन हात करीत त्यांची शिक्षणाची धडपड सुरू आहे. या विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक सत्रात वीज चोरी, वीज सुरक्षा आणि वीज कर्मचाºयांचा त्रास वाचविण्यासाठी ‘अ‍ॅडव्हान्स इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रिब्युशन सिस्टम’ नावाने प्रोजेक्ट तयार केला आहे. त्यांच्या प्रोजेक्टला राष्ट्रीय स्तरावर चार वेळा प्रथक क्रमांक मिळाला आहे. 
 
ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वीजचोरी होत असल्याचे या विद्यार्थ्यांच्या लक्षात आले. हे विद्यार्थी राहत असलेल्या ग्रामीण भागातील कारखाने चोरीच्या विजेवर चालत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. वाढत्या लोकसंख्येबरोबर वीजचोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. वीज चोरावंर कारवाई करण्यासाठी महावितरणजवळ पुरेशी यंत्रणा नसल्यामुळे  महावितरणला फटका बसतो आहे.
वीज चोरीतून बसलेला भुर्दंड महावितरण वीज दरवाढ करून ग्राहकांच्या खिशातून वसूल करीत आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेता या विद्यार्थ्यांनी आकोडा टाकल्यानंतरही चोरट्यांना वीज वापर करता येणार  नाही, अशा आधुनिक पद्धतीचे स्मार्ट मीटर तयार केले.  हे वीज मीटर सेट-टॉप बॉक्स सारखे काम करणार आहे. म्हणजे ज्यांच्या घरी मीटर असेल त्यांनाच वीज मिळले. विद्यार्थ्यांच्या मते विजेमध्ये व्होल्टेज, करंट आणि फ्रिक्वेन्सी असे तीन घटक असतात. या तीनही घटकाशिवाय विजेचा वापर करता येत नाही. विद्यार्थ्यांनी तयार केलेले स्मार्ट मीटर हे फ्रिक्वेन्सी कन्व्हर्ट करणार आहे. यात त्यांनी अ‍ॅसिलेटर सर्किटचा वापर केला आहे. त्यामुळे ज्यांच्या घरी मीटर असेल त्यांनाच वीज वापरता येणार आहे. चोरट्यांनी आकोडा टाकून वीजचोरीचा प्रयत्न केल्यास त्यांना व्होल्टेज मिळेल, करंट येईल, फ्रिक्वेन्सी नसल्यामुळे विजेची उपकरणे काम करणार नाही.