नेरळ : कर्जत तालुक्यातील खांडस प्राथमिक आरोग्य केंद्रात कायमस्वरूपी डॉक्टर नाहीत, उपचाराला पुरेशी साधनसामग्री नाही. त्यामुळे येथे येणाऱ्या रु ग्णांना उपचार वेळेवर मिळत नाहीत. त्यांना रु ग्णालय असून सुद्धा खासगी रु ग्णालयात धाव घ्यावी लागत आहे. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्राविरोधात ग्रामस्थांनी आक्र मक पवित्रा घेऊन आंदोलन छेडत प्राथमिक आरोग्य केंद्रालाच टाळे ठोकले आहे. त्यानंतर ग्रामस्थांनी तालुका आरोग्य अधिकारी सी.के.मोरे यांना घेराव घालत कायमस्वरूपी डॉक्टरांची नियुक्ती करण्याची मागणी केली.कर्जत तालुका हा आदिवासीबहुल तालुका असून, दुर्गम भागातील आदिवासींना आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी या हेतूने खांडस येथे काही वर्षांपूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात आले आहे. परंतु या प्राथमिक आरोग्य केंद्रात मागील दीड महिन्यापासून डॉक्टरच नसल्याने रु ग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. या आरोग्य केंद्रात ज्या डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे ते कधीही हजर नसतात, असे येथील ग्रामस्थांकडून सांगण्यात येते. खांडस हा अतिशय दुर्गम आणि आदिवासी भाग म्हणून ओळखला जातो. परंतु मागील दीड महिन्यापासून येथे डॉक्टरच नसल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या रु ग्णालयाला गावाशेजारी असणाऱ्या तलावातून पाणीपुरवठा केला जात असे. मात्र दोन वर्षापूर्वी पाणीपुरवठा करणाऱ्या विजेच्या पंपाचे बिल अदा केले नसल्याने वीज वितरण कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी करवाई करत रुग्णालयात पाणी पुरविणाऱ्या वीज पंपाचा विद्युत पुरवठा खंडित केला होता. त्यावेळी रुग्णालयात पाणी नसल्याने स्वच्छतागृह पाण्याअभावी बंद करण्यात आले होते. अशा अनेक कारणाने हे रु ग्णालय चर्चेत आहे.या प्राथमिक आरोग्य केंद्रात नियुक्ती केलेल्या डॉ. गीता कदम दोन महिन्यांच्या रजेवर असल्याने त्यांच्या जागी डॉ. भांबरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र त्या देखील रुग्णालयात दररोज हजर राहत नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या आरोग्य केंद्रात अनेक समस्या भेडसावत आहेत. कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी येथे वसाहत असून देखील ते तेथे राहत नाहीत,त्यामुळे प्रशासनाने या प्राथमिक आरोग्य केंद्रात लवकरात लवकर पुरेशा सोयी -सुविधा पुरवाव्यात व कायमस्वरु पी डॉक्टरांची नियुक्ती करावी, अशी मागणी त्यांनी आरोग्य अधिकाऱ्यांकडे केली आहे. (वार्ताहर)>कायमस्वरु पी डॉक्टरची मागणीएखाद्या रुग्णाला रु ग्णवाहिकेची गरज भासल्यास येथील कर्मचारी डिझेल नसल्याचे कारण देत आपले हात झटकतात.कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी येथे वसाहत असून देखील ते तेथे राहत नसल्याचे देखील ग्रामस्थ सांगतात. त्यामुळे प्रशासनाने या प्राथमिक आरोग्य केंद्रात लवकरात लवकर पुरेशा सोयी -सुविधा पुरवाव्यात व कायमस्वरु पी डॉक्टरांची नियुक्ती करावी, अशी मागणी त्यांनी आरोग्य अधिकाऱ्यांकडे केली आहे. नेमणूक करण्यात आलेले डॉक्टर हे पूर्वसूचना न देता रजेवर राहिल्याने हा प्रश्न निर्माण झाला आहे. परंतु त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असून जिल्हा प्रशासनाला याबाबत पत्रव्यवहार करण्यात आला आहे.- सी. के. मोरे, तालुका वैद्यकीय अधिकारीखांडस प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून डॉक्टर नसल्याने रु ग्णांचे हाल होत आहेत. अनेक वेळा तक्र ारी करूनही परिस्थिती जैसे थेच होती. येथे उपचार होत नसल्याने ग्रामस्थांनी आरोग्य केंद्राला टाळे ठोक ले- रवी ऐनकर, ग्रामस्थ, खांडस
खांडस आरोग्य केंद्राला ग्रामस्थांनी ठोकले टाळे
By admin | Published: September 19, 2016 2:52 AM