शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

अमित शाह आले तेव्हाच धक्का दिला असता, पण...; राऊत-राणेंमध्ये जुंपली

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2021 7:57 PM

अमित शाह सिंधुदुर्गात आले त्याच वेळी आम्ही भाजपला झटका देऊ शकत होतो. पण, राणेंची थोडी तरी राखावी, म्हणून आम्ही या सात नगरसेवकांचा पक्षप्रवेश दोन दिवस पुढे ढकलला.

सिंधुदुर्ग - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह राज्यसभा खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटनासाठी येऊन गेल्यानंतर, जिल्ह्यात राणे आणि खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्यात चांगलीच जुंपली आहे. राऊतांनी आता राणेंवर जबरदस्त पलटवार केला आहे. एवढेच नाही, तर त्यांनी निलेश राणे (Nilesh Rane) यांच्यावरही थेट निशाणा साधला आहे. (Vinayak Raut slams Narayan Rane and Nilesh Rane)

"अमित शाह सिंधुदुर्गात आले त्याच वेळी आम्ही भाजपला झटका देऊ शकत होतो. पण, राणेंची थोडी तरी राखावी, म्हणून आम्ही या सात नगरसेवकांचा पक्षप्रवेश दोन दिवस पुढे ढकलला," असे विनायक राऊत यांनी म्हटले आहे. ते एका स्थानिक वृत्त वाहिनीशी बोलत होते.  

मारामारी आणि शिवीगाळीची भाषा निलेश राणेंनाच शोभते -मारामारी, शिवीगाळ आणि अरेरावीची भाषा निलेश राणेंनाच शोभते. ती भाषा इतरांना शोभत नाही. त्यांच्या बकवासगिरीला कोकणातील जनतेने एकदा नाही, तर दोन वेळा धडा शिकवला आहे. ते त्यांना पुन्हा एकदा धडा शिकवतील, असे राऊत यांनी म्हटले आहे. एवढेच नाही, तर नितेश राणेंना कंटाळून वैभववाडीचे नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करत आहेत. यानंतर जिल्ह्यातील भाजपचे आणखी काही पदाधिकारी शिवसेनेत येतील, असेही राऊत म्हणाले.

अमित शहा सिंधुदूर्गमध्ये येऊन जात नाहीत तोच शिवसेनेचा भाजपला धक्का -  अमित शहा सिंधुदूर्गमध्ये येऊन जात नाहीत तोच शिवसेनेने आमदार नितेश राणे यांच्या मतदारसंघातील वैभववाडी नगरपरिषदेचे 7 नगरसेवक फोडले आहेत. हे नगरसेवक लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असून यावर नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे हार, गुच्छ घेणार नसल्याने हे नगरसेवक व्हॅलेंटाईन गिफ्ट असल्याचे म्हटले होते. आता नारायण राणेंना केंद्रात मंत्रिपद मिळण्यावरून चर्चा जोर धरू लागली आहे. यावर शिवसेनेने टीका केली आहे. 

नारायण राणे नॉन मॅट्रिक माणूस -  राऊतनारायण राणेंसारख्या नॉन मॅट्रिक माणसाला केंद्रात मंत्रिपद देण्याची वेळ आली, तर दुर्दैवच, असा टोला राऊत यांनी भाजपला हाणला आहे. कॉलेजच्या उद्घाटनासाठी मंजुरीच्या फाईलवर सही करण्यासाठी मातोश्रीवर फोन केल्याचे राणे यांनी सांगितले होते. त्या आधी राऊत यांनीदेखील राणे सारखे सारखे मातोश्रीवर फोन करत असल्याचे म्हटले होते. त्याला राणे यांनी महिनाभराने कबुलीही दिली होती. 

काय म्हणाले होते निलेश राणे - वाभदे-वैभववाडी नगरपंचायतमध्ये भाजपची एक हाती सत्ता होती. 17 पैकी 17 नगरसेवक हे भाजपकडे होते. मात्र सोमवारी त्यातील 7 नगरसेवक फुटून आज शिवसेनेत प्रवेश करत असल्याने भाजपला मोठा धक्का बसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र याचदरम्यान भाजपाने शिवसेनेलादेखील आता इशारा दिला आहे. आमचे जेवढे नगरसेवक फोडले, त्याच्या पाच पटीने तुमचे फोडणार, असा इशारा भाजपाचे खासदार नारायण राणे यांचे पुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी दिला आहे.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होणार आहे. या 7 जणांसह माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांचाही समावेश आहे. भाजपाचे आमदार नितेश राणे सोमवारपर्यंत त्यांच्या परिवारावर दबाव टाकत होते, असा आरोप या नगरसेवकांनी केला आहे. 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणेVinayak Rautविनायक राऊत Nitesh Raneनीतेश राणे Nilesh Raneनिलेश राणे sindhudurgसिंधुदुर्गShiv SenaशिवसेनाBJPभाजपा