परळी (जि. बीड) : सोने चोरीच्या आरोपाने व्यथित झाल्याने वीणेकºयाने गळफास घेऊन स्वत:ला संपविले. परळी तालुक्यातील तडोळी येथील वीणेकरी लिंबाजी बापुराव सातभाई (६०) उर्फ माउली यांनी बुधवारी एकादशीच्या दिवशी सकाळी गळफास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, पाच भाऊ असा परिवार आहे.घटनास्थळी पोलिसांना लिंबाजी यांच्या शर्टच्या खिशात हरीपाठ आणि डायरी सापडली. डायरीत त्यांनी अनेक अभंगही लिहिलेले आढळून आले आहेत. खोटा गुन्हा दाखल करणाºयाविरुद्ध तत्काळ गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ, नातेवाइकांनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला. त्यानंतर रोडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले.सोनपेठ (जि. परभणी) तालुक्यातील गंगापिंप्री येथे २८ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर दरम्यान दत्त जयंतीनिमित्त सप्ताह झाला. वैजनाथ रंगनाथ रोडे यांनी सातभाई यांना सात दिवसांसाठी १,५०० रुपये ठरवून वीणेकरी म्हणून बोलावले होते़ त्यांच्याच घरी सातभाई यांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली होती़४ डिसेंबरला दुपारी घरावरील सज्जामध्ये ठेवलेल्या १५ ते २० ग्रंथांमधून ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचायचा आहे, असे म्हणून ग्रंथ पाहत असताना ग्रंथाच्या पाठीमागे ठेवलेली पाच तोळे सोन्याच्या दागिन्यांची पिशवी सातभाई यांनी चोरली, असा रोडे यांचा आरोप होता. त्यांनी सोनपेठ पोलिसांकडे तशी तक्रार दिली. त्यावरून ११ डिसेंबरला सातभाई यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला होता. त्यानंतर सातभाई हे तणावात होते. मंगळवारी रात्री त्यांनी शेवटचा राम राम असे सर्वांना सांगितले. तडोळीच्या गावकºयांनी त्यांची समजूत काढली. एकादशीच्या दिवशी त्यांनी आत्महत्या केली़प्रवृत्त केल्याचा गुन्हासातभाई यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गंगापिंपरी येथील वैजनाथ रोडे याच्याविरुद्ध परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक कैलास सपकाळ यांनी दिली.
सोने चोरीच्या आरोपामुळे वीणेक-याची आत्महत्या, एकादशीची घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 1:24 AM