शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरेंनी आनंद दिघेंचा अपघाताआधी मागितला होता राजीनामा", कदमांचा गौप्यस्फोट
2
पुराचे थैमान! नेपाळमध्ये परिस्थिती गंभीर; १७० जणांचा मृत्यू, १११ जण जखमी, ४२ बेपत्ता
3
कार अपघातात एअरबॅग उघडली पण आईच्या मांडीवर बसलेल्या २ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू
4
"भाग्यश्री आत्राम अहेरीत पराभूत होतील"; शरद पवारांच्या उमेदवाराला काँग्रेसचाच विरोध
5
"केवळ ७% जीडीपी वाढ पुरेशी नाही..," RBI चे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचं बेरोजगारीबद्दल मोठं वक्तव्य
6
IND vs BAN : जबरदस्त सेटअप! कमालीच्या इन स्विंग चेंडूवर बुमराहनं उडवला रहिमचा त्रिफळा
7
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
8
खुशखबर! सुनीता विल्यम्स पृथ्वीवर लवकरच परतणार; नासाची टीम अंतराळात पोहोचली, पहिला व्हिडीओ आला समोर
9
शेअर मार्केटमध्ये मोठी गॅप डाऊन ओपनिंग; निफ्टी सपोर्ट लेव्हलवर, भूराजकीय तणावात खरेदी करावी की नाही?
10
"कुठे गेले ते १५ मिनिटवाले...?"; आमदार नितेश राणेंचा ओवैसींवर हल्लाबोल
11
"माझी बाहुली हरवली म्हणून भोकाड पसरणारे..."; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंचा पलटवार
12
Success Story: ८००० रुपये कर्ज घेऊन सुरू केलं काम; आज ८०० कोटींच्या मालकिण, कपड्यांचा आहे मोठा ब्रँड
13
आधी संसदेत बसवताना केला होता विरोध, आता उदयनिधी यांच्या हातातच 'सेंगोल' दिसले
14
तिरुपती लाडू वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; याचिकाकर्त्यांने सीबीआय चौकशीची मागणी केली
15
बाप बन गया रे! रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, पापाराझींसमोर व्यक्त केल्या भावना
16
सोशल मीडियात ट्रेंड करणारे 'पंखेवाले बाबा' लड्डू मुत्या स्वामी नेमके कोण आहेत?
17
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रत्येक काम आत्मविश्वासाने यशस्वीपणे पूर्ण करू शकाल
18
निवडणुका वेळेवरच ! पण अधिकाऱ्यांच्या आता बदल्या का नको...
19
KKK 14 Winner: करणवीर मेहरा झाला KKK 14 चा विजेता, गश्मीर महाजनीची संधी थोडक्यात हुकली
20
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 

विधानसभा उपाध्यक्षांच्या ओएसडीसह तिघांवर गुन्हा

By admin | Published: August 14, 2014 1:15 AM

महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष आमदार वसंत पुरके यांच्या ओएसडीसह तीन जणांविरुद्ध बुधवारी पांढरकवडा पोलीस ठाण्यात बहुचर्चित जनरेटर खरेदी घोटाळ्याप्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला.

जनरेटर खरेदी घोटाळा : पांढरकवडा येथे २९ लाखांची अफरातफर पांढरकवडा : महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष आमदार वसंत पुरके यांच्या ओएसडीसह तीन जणांविरुद्ध बुधवारी पांढरकवडा पोलीस ठाण्यात बहुचर्चित जनरेटर खरेदी घोटाळ्याप्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला.सारंग कोंडलकर असे या ओएसडीचे (आॅफिसर आॅन स्पेशल ड्युटी) नाव आहे. ते मुळात उपविभागीय महसूल अधिकारी आहेत. सध्या ते आमदार पुरके यांचे ओएसडी म्हणून कार्यरत आहेत. २०११ मध्ये ते आदिवासी विकास विभागात पांढरकवडा येथे प्रकल्प अधिकारी म्हणून प्रतिनियुक्तीवर होते. कोंडलकर यांच्यासह अमरावतीचे तत्कालीन आदिवासी विकास अपर आयुक्त व्ही.जे. वरवंटकर, जे.एस. एन्टरप्राईजेस मुंबईचा मालक शब्बीर अली मौसीद अली या तिघांविरुद्ध पांढरकवडा पोलिसांनी भादंवि ४२०, ४६५, ४६९, ४७१ तसेच लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलम १०, १२, १३ (१) (३) अन्वये गुन्हा नोंदविला आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अकोला येथील पोलीस उपअधीक्षक यु.के. जाधव यांनी पांढरकवडा पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल केली. पांढरकवडा प्रकल्पांतर्गत येणाऱ्या आदिवासी आश्रमशाळांमध्ये विद्युतीकरणासाठी जनरेटरचा पुरवठा करण्याचे ठरले होते. त्यासाठी २० मार्च २०११ ते ३१ मार्च २०११ या काळात जनरेटरची खरेदी करण्यात आली. त्याकरिता बनावट कागदपत्रेही तयार केली गेली. त्यात २९ लाख १६ हजार ४८० रुपयांचा भ्रष्टाचार केला गेला. या प्रकरणात शासनाची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले. अमरावती अपर आयुक्त यांच्या स्तरावर सुमारे दोन कोटी रुपयांचा जनरेटर खरेदी घोटाळा झाला आहे. अमरावतीचे माजी आमदार जगदीश गुप्ता यांनी सर्वप्रथम यासंबंधी विभागीय महसूल आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती. याच तक्रारीवर आयुक्तांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला चौकशीचे आदेश दिले होते. त्या चौकशीत घोटाळा निष्पन्न झाल्याने अकोला व पाठोपाठ पांढरकवडा येथे गुन्हे नोंदविले गेले. (शहर प्रतिनिधी)