शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् मोठ्या तोंडाने सांगतात..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
4
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
5
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
6
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
7
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
8
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
9
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
10
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
11
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
12
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
13
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
14
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
15
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
16
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
17
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
18
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
19
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
20
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द

हिंसक वळण :ऊस दरासाठी पेटले आंदोलन, पोलिसांच्या गोळीबारात दोन शेतकरी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 3:18 AM

स्वाभिमानी शेतकरी संघटना व ऊस उत्पादकांच्या ऊस दर आंदोलनाला बुधवारी शेवगाव तालुक्यात हिंसक वळण लागले़ जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी अश्रूधूर व अ‍ॅक्शन गनच्या सहाय्याने प्लॅस्टिक बुलेटचा मारा केला.

अहमदनगर : स्वाभिमानी शेतकरी संघटना व ऊस उत्पादकांच्या ऊस दर आंदोलनाला बुधवारी शेवगाव तालुक्यात हिंसक वळण लागले़ जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी अश्रूधूर व अ‍ॅक्शन गनच्या सहाय्याने प्लॅस्टिक बुलेटचा मारा केला. गोळीबारात पैठण तालुक्यातील दोन शेतकरी, तर आंदोलकांच्या दगडफेकीत तीन पोलीस अधिकारी जखमी झाले.उद्धव विक्रम मापारे (३४) व नारायण भानुदास दुकळे (४५ दोघे, रा़ तेलवाडी, ता़ पैठण) या जखमी शेतकºयांवर नगरला उपचार सुरू आहेत़ उद्धव यांच्या छातीत उजव्या बाजूला छर्रा घुसला आहे.नगर व औरंगाबाद जिल्ह्यांच्या सीमेवरील गंगामाई खासगी कारखान्याने भाव जाहीर केला नव्हता. ३,१०० रुपये भावासाठी खानापूर, घोटण परिसरात शेतकºयांचे रास्ता रोको आंदोलन सुरू होते. औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकरीही त्यात सहभागी होते. आंदोलकांनी वाहने अडविल्याने चार किमीपर्यंत रांगा लागल्या. पोलिसांनी १५ जणांना ताब्यात घेतल्यानंतर आंदोलक आक्रमक झाले. त्यामुळे पोलिसांनी लाठीमार केला. अश्रूधुराचाही वापर केला. आंदोलकांनी वाहनांची तोडफोड व जाळपोळ केल्याने पोलिसांना प्लॅस्टिक गन वापरावी लागली, असे पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी सांगितले. पैठणमध्येही पोलिसांनी काहींची धरपकड केली.सोलापुरात रास्ता रोको-सोलापूरमध्ये सांगोल्यात ऊसाच्या दरावरून आंदोलकांनी ट्रॅक्टरचे टायर फोडले. मंगळवेढ्यात रास्ता रोको आंदोलन केले.बैठकीनंतर शांत झाले शेतकरी-घटनेनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर हे शेवगावमध्ये आले. अप्पर पोलीस अधीक्षक घनश्याम पाटील, प्रांताधिकारी विक्रम बांदल व शेतकरी नेत्यांमध्ये सायंकाळी बैठक झाली. त्यानंतर, गंगामाई कारखान्याने २,५२५ रुपये भाव जाहीर केला.बैठकीनंतर आंदोलन स्थगित केल्याचे तुपकर यांनी सांगितले.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरीStrikeसंप