लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सेवेतील खासगी कंपनीच्या हेलिकॉप्टरमध्ये वारंवार तांत्रिक बिघाड होत असल्याने व्हीआयपींसाठीची खासगी हेलिकॉप्टर सेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. सुरक्षेचा आढावा घेतल्यानंतर ती पूर्ववत होईल, असे सुत्रांनी सांगितले.मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची घटना नुकतीच रायगडमध्ये घडली. या अगोदर गडचिरोली आणि निलंगा (जि.लातूर) येथे अशाच घटना घडल्या आहेत. निलंग्यात तर मुख्यमंत्री थोडक्यात बचावले. वारंवार घडणाऱ्या या घटनांची दखल घेत नागरी हवाई वाहतूक महासंचलनालयाने (डीजीसीए) खासगी कंपनीची हेलिकॉप्टर सेवा आठ दिवसांसाठी स्थगित केली आहे.>‘डीजीसीए’कडून चौकशीव्हीआयपी व्यक्तींच्या सुरक्षेचे मार्गदर्शक तत्वे आणखी काटेकोर करण्यात येणार असून ‘डीजीसीए’कडून रायगड हेलिकॉप्टर प्रकरणाची चौकशी सुरु करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.मुख्यमंत्री फडणवीस यांनी अलिबागहून मुंबईकडे येण्यासाठी वापरलेले व्हीटी यूपीबी हे बेल ३२० प्रकारचे हेलिकॉप्टर २२ वर्षे जुने आहे. महाराष्ट्र सरकारने अतिमहत्वाच्या व्यक्तींसाठी हेलिकॉप्टर भाड्याने घेण्यासाठी अॅडोनीस आणि अलॉफ्ट या दोन कंपन्याशी करार केला आहे. या दोन कंपन्यांकडून मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासाठी हेलिकॉप्टर आणि विमान भाड्याने घेतले जाते.
सुरक्षेच्या कारणाने व्हीआयपींची खासगी हेलिकॉप्टर सेवा स्थगित
By admin | Published: July 10, 2017 5:57 AM