लोकमत न्यूज नेटवर्कवसई : तीन मुलांची आई असलेल्या रूबीनाला अकबर खानने कुवेतवरून कुरिअरने तलाकनामा पाठवला. राहते घर दुसऱ्याला विकण्यात आले. त्यामुळे तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी अकबर खान, सासरे जलील, सासू झुबेदा, दीर उमर, देवरानी अस्मा, नणंद नुरी विरोधात गुन्हा दाखल केला.रूबीना आणि अकबर यांच्यात२०१५ मध्ये दोघांमध्ये मोठा वाद होऊन प्रकरण कोर्टात पोचले. अकबरने रुबीनाशी समझौता केला. दोघांमध्ये लेखी करार झाला. त्यात फ्लॅट रुबीना आणि मुलांना दिला जाईल. तो विकण्यात येणार नाही. तसेच खर्चासाठी दर महिन्याला रक्कम देऊ, असे अकबरने मान्य केले होते. मात्र, त्याने नोव्हेंबर २०१६ मध्ये तिला कुवेतहून कुरिअरव्दारे तलाकनामा पाठवला. पैसे पाठवणेही बंद केले. रुबीना १५ मे २०१७ ला आठ दिवस बाहेरगावी गेल्यावर तिचा फ्लॅट परस्पर दुसऱ्याला विकला. त्यात ६ लाखांचे दागिने, इतर सामानही गायब आहे.
नालासोपाऱ्यातील महिलेला कुरिअरने तलाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2017 3:27 AM