धक्कादायक! विसर्जनानंतर काही मिनिटांतच गणेशमूर्ती शेडमध्ये, यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2018 09:48 PM2018-09-17T21:48:51+5:302018-09-17T22:06:09+5:30
गणेश विसर्जनानंतर केवळ काही मिनिटे मूर्ती हौदात ठेऊन नंतर बाजुच्या पत्र्याच्या ठेवल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातील विसर्जन हौदावर होत असल्याचा धक्कादायक प्रकार ‘लोकमत’च्या पाहणीत दिसून आला आहे.
युगंधर ताजणे /तन्मय ठोंबरे
पुणे : गणेश विसर्जनानंतर केवळ काही मिनिटे मूर्ती हौदात ठेऊन नंतर बाजुच्या पत्र्याच्या ठेवल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातील विसर्जन हौदावर होत असल्याचा धक्कादायक प्रकार ‘लोकमत’च्या पाहणीत दिसून आला आहे. महापालिकेतर्फे नेमण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांकडून हे कृत्य केले जात असल्याचे दिसून आले आहे.
पुणे महापालिकेच्या वतीने पाचव्या दिवसाच्या विसर्जनाची शहरातील अनेक घाटांवर तसेच सार्वजनिक ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या प्रांगणातही विसर्जन हौद आहे. सकाळपासून परिसरातील भाविकांची श्रींच्या विसर्जनाकरिता त्या हौदावर गर्दी सुरु होती. दुपारी चारच्या दरम्यान मोठ्या संख्येने गणेशभक्त विसर्जनस्थळी येऊ लागले. भाविक मोठ्या भक्तिभावाने, आनंदाने श्रींची आरती करुन, त्यांना भावपूर्ण निरोप देत होते. हौदाच्या बाहेर उभ्या असलेले कर्मचा-यांकडे ते मुर्ती देत. मात्र भाविकांनी पाठ फिरविल्यानंतर ते क र्मचारी मोठ्या शिताफीने ती मुर्ती हौदाच्या बाजुस असलेल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये ठेवत होते.
हौदाजवळ तैनात असलेल्या एका कर्मचा-याला यासंबंधी विचारले असता त्याने हौदात मूर्तींची गर्दी होते. तिला पाय लागतो. भाविकांना ते आवडत नाही. यामुळे पुन्हा मूर्ती बाहेर काढून ठेवतो. त्यानंतर सर्व मुर्त्यांना एकत्रित पध्दतीने विसर्जित करतो, असे सांगितले. मात्र, भाविकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मूर्तींचे पुन्हा विधिवत विसर्जन होईल, का याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.
पत्र्याच्या शेडमधील मुर्तीविषयी विचारल्यावर मात्र बोलण्यास टाळाटाळ करत होते. यावर अनेकांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. एकाच हौदाभोवती पाच ते सहा कर्मचारी उभे होते. भाविकाने मुर्ती त्यांच्या हाती दिल्यानंतर तातडीने ती मुर्ती बाजुच्या सहका-याकडे देणे, त्याने ती आपल्या शेजारच्या सहका-याकडे ती सोपविणे आणि सर्वात शेवटच्या कर्मचारी अत्यंत सावधपणे, कुणालाही काही कळु न देता त्या श्रींच्या मुर्तीला पत्र्याच्या शेडमध्ये ठेवत होता.
विसर्जनासाठी भाविकांकडून गणेशमूर्ती आमच्याकडे सोपविल्या जातात. त्या पाण्यात विरघळेपर्यंत आम्ही ठेवतो. एकाच हौदात सगळ्या मूर्ती बसणे शक्य नाही. म्हणून त्या बाजुला ठेवतो. नंतर पुन्हा त्या मूर्ती पाण्यात विरघळण्यासाठी ठेवतो.
- विसर्जनस्थळावरील एक कर्मचारी
व्हिडीओ -