शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

विश्वांजली गायकवाड राज्यात प्रथम

By admin | Published: June 01, 2017 4:11 AM

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) २०१६मध्ये झालेल्या मुख्य परीक्षेचा निकाल बुधवारी रात्री जाहीर झाला. पुण्याची विश्वांजली गायकवाड

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) २०१६मध्ये झालेल्या मुख्य परीक्षेचा निकाल बुधवारी रात्री जाहीर झाला. पुण्याची विश्वांजली गायकवाड ही राज्यात प्रथम आली आहे. देशभरातून १,०९९ जण उत्तीर्ण झाले असून, त्यामध्ये राज्यातील विद्यार्थ्यांनीही चमकदार कामगिरी केली आहे.विश्वांजली गायकवाड देशात ११वी आली असून, स्वप्निल खरे देशात ४३वा आला आहे. विश्वांजली दुसऱ्या प्रयत्नामध्ये उत्तीर्ण झाली असून, तिला परराष्ट्र सेवेत जायचे आहे. याशिवाय स्वप्निल रवींद्र पाटील (५५), भाग्यश्री दिलीप विसपुते (१०३), प्रांजली लहेनसिंग पाटील (१२४), सूरज अनंता जाधव (१५१), स्नेहल सुधाकर लोखंडे (१८४), अनुज मिलिंद तारे (१८९), विदेह खरे (२०५), राहुल नामदेव धोटे (२०९), अंकिता धाकरे (२११), योगेश तुकाराम भारसट (२१५), श्रद्धा पांडे (२१९), किरण खरे (२२१), स्वप्निल थोरात (६००), अभिषेक टाले (८७७) हे राज्यातील विद्यार्थी चमकले आहेत़ विश्वांजलीने २०१४मध्ये सीओईपीमधून कॉम्प्युटर इंजिनीअरिंग केले आहे. गेल्या ३ वर्षांपासून ती यूपीएससीची तयारी करीत होती. तिचे आई व वडील दोघेही मराठवाडा मित्र मंडळ महाविद्यालयामध्ये प्राध्यापक आहेत. तिचा भाऊ इंजिनीअरिंग करतो आहे. विश्वांजली राज्यात पहिली आल्याचा निकाल जाहीर होताच तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला. प्रभात रोडवरील तिच्या निवासस्थानी तिचे नातेवाईक व प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी धाव घेतली.ठाण्याचा स्वप्निल पाटील ५५वायूपीएससी परीक्षेत ठाण्याच्या चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्या चार विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. संस्थेच्या स्वप्निल पाटील याने देशात ५५वा क्रमांक पटकावला आहे. आपल्या अंधत्वावर मात करीत गतवर्षी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या उल्हासनगरच्या प्रांजली पाटील हिने सलग दुसऱ्या वर्षी ही परीक्षा उत्तीर्ण होताना ७७३वरून १२४व्या क्रमांकावर मजल मारली.श्रद्धा पांडे हिचा २१९वा, तर स्वप्निल थोरात याचा ६००वा क्रमांक आला आहे. त्याचबरोबर संस्थेच्याच जगदीश बाकन यांची डिस्ट्रिक्ट फॉरेस्ट आॅफिसर म्हणून निवड झाली आहे. संस्थेचे संचालक प्रकाश बाळ यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. उल्हासनगरचा अभिषेक टाले हा ८७७व्या गुणानुक्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. तो ‘पीआरपी’चे ठाणे जिल्हाध्यक्ष व नगरसेवक प्रमोद टाले यांचा मुलगा आहे.गेली चार वर्षे मी या परीक्षेकरिता अभ्यास करीत असून हा माझा चौथा प्रयत्न होता. सुरुवातीला लेखी, मुलाखत अशा विविध फेऱ्यांमध्ये मी नापास झालो. मात्र, हिंमत न हारता दररोज सुमारे १२ तास मी अभ्यास केला. - स्वप्निल पाटील, यूपीएससी परीक्षेत ५५वा क्रमांक