शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
2
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
3
Chinmoy Krishna Das: बांगलादेशात चिन्मय कृष्णा दास यांना अटक, प्रकरण काय?
4
धक्कादायक! नर्स बनून आल्या अन् ब्लड टेस्टच्या बहाण्याने चोरलं बाळ; घटना सीसीटीव्हीत कैद
5
घडामोडींना वेग; एकनाथ शिंदेंच्या आजी-माजी खासदारांनी मोदींकडे मागितली भेटीची वेळ 
6
"बंदुका हिसकवा, पोलिसांना पळून जावू देवू नका’’, जमावातून दिली जात होती चिथावणी, संभल हिंसाचाराबाबतच्या FIRमधून धक्कादायक माहिती समोर   
7
पारंपरिक पद्धतीने होणार नागा चैतन्य-शोभिताचा लग्नसोहळा, तब्बल ८ तास चालणार सर्व विधी
8
बकिंगहॅम पॅलेसपेक्षाही मोठा महाल; जगातील सर्वात मोठं खासगी निवासस्थान, कोण आहेत राधिकाराजे गायकवाड?
9
मराठी येत नाही, माफी मागणार नाही, हिंदीत बोला; रेल्वे कर्मचाऱ्याने घातला वाद
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्री निवासस्थावरील एकनाथ शिंदेंच्या नावाची पाटी आधी काढली, पुन्हा लावली; चर्चांना उधाण
11
अनुषाने 'लव्ह यू' म्हणत भूषणच्या वाढदिवसानिमित्त केली पोस्ट; चाहते म्हणाले, "आता लग्नच करा..."
12
Maharashtra Assembly Election Result 2024: मुख्यमंत्रिपद टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्नशील; भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांसाठी आग्रही
13
तुमचं Pan Card निरुपयोगी होणार का? QR कोडसह नवीन कार्ड कसं मिळवायचं, जाणून घ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं
14
IPL 2025 : कोणत्या खेळाडूला किती भाव मिळाला? सर्व १० संघांची संपूर्ण यादी एका क्लिकवर
15
नागा चैतन्यशी घटस्फोटावर समांथाने ३ वर्षांनी सोडलं मौन, म्हणाली- "माझ्याबद्दल खोट्या गोष्टी सांगितल्या गेल्या..."
16
Essar समूहाचे सह-संस्थापक शशी रुईया यांचं निधन; ८० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
चंदिगडमध्ये रॅपर बादशाहच्या नाईट क्लबमध्ये स्फोट; खंडणीच्या उद्देशाने स्फोट, पोलिसांचा दावा
18
अरेरे! १.२५ लाख पगार, नवरदेवाने दाखवली सॅलरी स्लीप पण ऐनवेळी नवरीने दिला नकार, कारण...
19
RBI गव्हर्नर शक्तिकांता दास यांची प्रकृती अचानक बिघडली 
20
Maharashtra Election: 'या' १२ मतदारसंघात बसपा, वंचित व मनसेपेक्षा अपक्ष उमेदवार ठरले भारी!

जिओ ग्राहकांची माहिती चोरीला

By admin | Published: July 13, 2017 5:14 AM

जिओ ग्राहकांची माहिती चोरीला गेल्याची तक्रार रिलायन्सतर्फे पोलिसांकडे करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : जिओ ग्राहकांची माहिती चोरीला गेल्याची तक्रार रिलायन्सतर्फे पोलिसांकडे करण्यात आली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल झाल्यानंतर महाराष्ट्र सायबर सेल व नवी मुंबई सायबर सेलने जयपूर येथून इमरान चिपा याला अटक केली असून तो संगणकतज्ज्ञ आहे.रिलायन्सच्या जिओ ग्राहकांची संपूर्ण माहिती मॅजिका संकेतस्थळावर ग्राहकांच्या नंबरवरून सहज उपलब्ध होती. ही बाब निदर्शनास आल्यानंतर ग्राहकांची गोपनीय माहिती चोरीला गेल्याची तक्रार रिलायन्स जिओ कंपनीने रबाळे पोलिसांकडे केली. त्यानुसार पुढील तपासाकरिता हा गुन्हा सायबर सेलकडे वर्ग झाल्यानंतर महाराष्ट्र व नवी मुंबई सायबर सेलने कसून केलेल्या तपासादरम्यान जिओच्या संकेतस्थळावरून माहिती चोरलेल्या संगणकाचा आयपी अ‍ॅड्रेस मिळाला. त्याद्वारे पोलिसांनी शोध घेतल्यावर तो संगणक जयपूरमधील सुजानगढ येथील इमरान चिपाच्या घरचा असल्याचे उघड झाले. त्यानुसार स्थानिक पोलिसांच्या मदतीने महाराष्ट्र सायबर सेल व नवी मुंबई सायबर सेलच्या पथकाने त्याला अटक केली आहे. बुधवारी सकाळी नवी मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने जयपूरहून त्याला ताब्यात घेतले. इमरानने जिओ ग्राहकांचा डेटा चोरून मॅजिका संकेतस्थळासाठी पुरवल्याची शक्यता आहे. मात्र, त्यामागचा उद्देश व त्याला मोबदला काय मिळाला? याबाबत माहिती उघड झालेली नाही. याप्रकरणी नवी मुंबई सायबर क्राइम पोलीस अधिक तपास करत आहेत.