ऑनलाइन लोकमतकजगाव, दि. 13 - लोण पिराचे येथे १४ व १५ रोजी यात्रोत्सव व विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी पीरबाबाचा दर्गा असून हिंदू-मुस्लीम एकतेचा संदेश येथे मिळतो. दर्ग्याची देखभाल व पूजाअर्चा पाटील मंडळी अनेक वर्षापासून करीत आहे.कजगावपासून ६ कि.मी. वरील लोणपिराचे येथे हा पिरबाबाचा दर्गा आहे. वर्षभरात दोन उत्सव येथे होतात. यात मोहरमच्या महिन्यात ताजिये बनवतात व परिसातील खेड्यात मिरवले जातात. यावेळी नवस फेडणाऱ्यांची मोठी गर्दी येथे होते. नवसासाठी रोट बनवले जातात. दुसरा कार्यक्रम यात्रोत्सवाचा असतो. १४ रोजी सकाळी गावातून चादर मिरवणूक काढली जाते व रात्री कव्वालीचा कार्यक्रम होतो.१५ रोजी यात्रोत्सव व रात्री लोकनाट्याचा कार्यक्रम होतो. तसेच नवस फेडणाऱ्या भाविकांचीही मोठी गर्दी होत असते. यात्रोत्सवानिमित्त परिसरातील व बाहेरगावी गेलेले नागरिक गावाला परततात. लोण व आजूबाजूच्या लहान मोठ्या गावातील नागरिक यात्रोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होतात.
यात्रेद्वारे एकात्मतेचे दर्शन
By admin | Published: February 13, 2017 8:42 PM