पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन पंढरपूरचे विठ्ठल मंदीर आषाढी एकादशीपर्यंत बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे भाविकांनी सदर कालावधीपर्यंत पंढरपूर येथे दर्शनासाठी प्रवास करु नये, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले आहे.कोरोनाच्या संकटामुळे सध्या आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पायी पालखी सोहळा रद्द झाला असला तरी राज्यभरातील विठ्ठल भक्तांना विठूरायाच्या दर्शनाची आस लागली आहे. यामुळे भाविक पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी जाण्याची शक्यता लक्षात घेऊन विभागीय आयुक्त यांनी हे आदेश काढले आहेत. या संदर्भात म्हैसेकर यांनी पंढरपुर येथे दर्शन करण्यास जाण्याकरीता प्रवास पास वितरीत न करण्याबाबतच्या सूचना सर्व जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्या आहेत. तसेच या संदर्भात सर्व विभागीय आयुक्त यांना देखील स्पष्ट सूचना देण्यात आल्या असल्याचे म्हैसेकर यांनी येथे सांगितले.
पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीला दर्शनासाठी परवानगी नाही : विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 8:17 PM
राज्यातील भाविकांनी पंढरपूरला येऊ नये
ठळक मुद्देकोरोनाच्या संकटामुळे सध्या आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पायी पालखी सोहळा रद्द