शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

जायफळापासून वेदनाशामक औषधाची निर्मिती

By admin | Published: October 04, 2016 8:49 AM

इगतपुरी तालुक्यातील प्राचार्य डॉ. योगेश उशीर आणि डॉ. सुदर्शन सिंग यांनी जायफळापासून वेदनाशामक औषधाची निर्मिती केली आहे.

लक्ष्मण सोनवणे, ऑनलाइन लोकमत

बेलगाव कुऱ्हे (नाशिक), दि. ४ -  मनुष्य जन्माला येतो तेव्हापासून अनेक छोट्या मोठ्या आजारांचा प्रतिकार त्याला करावा लागतो. त्यातच काही भयानक आजारांवर गोरगरिबांना आर्थिक झळ ही अजिबात परवडणारी नसते. गरीब रुग्णांमध्ये ईश्वराचे अस्तित्व समजणाऱ्या एका प्राचार्यांना आरोग्यवर्धक जायफळापासून एका विशेष संशोधनातून वेदनाशामक औषधाची निर्मिती करण्यास मोठे यश मिळाले आहे.इगतपुरी तालुक्यातील धामणगाव येथील एसएमबीटी डी फार्मसी सेवाभावी ट्रस्टमधील प्राचार्य डॉ. योगेश विष्णुपंत उशीर आणि डॉ. सुदर्शन सिंग यांनी विद्यार्थ्यांना डॉक्टरकीचे शिक्षण देताना फावल्या वेळात त्यांनी ‘टॉपिकल जेल फॉर्म्युलेशन आॅफ टायमेटिन’ या विषयावर पेटंटची नोंदणी करून दोन वर्षांच्या अथक परिश्रमातून वेदनाशामक या परिपूर्ण औषधाची यशस्वीरीत्या निर्मिती केली आहे. त्यांनी शोधलेले टायमेटीनचे मलम हे औषध अनेक आजारांवर रामबाण व गुणकारी ठरले आहे. या महत्त्वाच्या औषधाची सहज उपलब्धता, सोपी निर्मितीपद्धती आणि वापरण्यास सोईस्कर असल्याने आरोग्यक्षेत्रातील विविध थरांतून त्यांचे कौतुक केले जात आहे.डॉ. उशीर व डॉ. सिंग औषधनिर्माण क्षेत्रात अनेक वर्षांपासून संशोधन करत आहेत. या संशोधनात त्यांना असे आढळून आले की, दैनंदिन जीवनात वापरात येणाऱ्या आणि निसर्गातून सहज उपलब्ध होणाऱ्या जायफळात ‘टायमेटिन’ हा घटक आहे आणि तो शरीरातील वेदना, चमक तसेच सुजही कमी करतो. जायफळातील टायमेटीन विलग करून त्याचे जेल फॉर्म्युलेशन अर्थात मलम बनविल्याने रु ग्णांना सहजतेने वापरता येऊ शकते आणि कमीत कमी दरात सर्वसामान्यांना उपलब्धही होऊ शकते. या त्यांच्या रु ग्णांप्रति आत्मीयतेतून त्यांनी पुढील तपासणी केली. संशोधनात्मक तपासणीनंतर सकारात्मक परिणाम दिसून आले. त्यांनी विलग केलेले टायमेटिन जलद गतीने त्वचेद्वारे रक्तात प्रवेश करते आणि लवकरात लवकर शरीरातील चमक किंवा वेदना शमवते. तसेच शरीरावरील सुजही कमी करते. या औषधाचे शरीरावर घातक परिणाम होत नाहीत, असे निकष त्यांनी केलेल्या विस्तारपूर्वक संशोधनातून समोर आले आहेत. दि. २० जून २०१६ रोजी भारतीय पेटंट कार्यालयात नोंद केलेल्या या शोधाचा पेटंट क्र मांक आयएन 201621021529/ एमयूएम असा आहे. तालुक्यातील धामणगाव येथील एसएमबीटी इन्स्टिट्यूट आॅफ डी फार्मसीमधून केलेले हे संशोधन व पहिले यशस्वी पेटंट अनेक रु ग्णांसाठी वरदान ठरले आहे. सदर विषयावर त्यांचे गेल्या दोन वर्षापासून निरंतर संशोधन सुरू होते. आगळ्यावेगळ्या जायफळाच्या वेदनाशामक औषध निर्मितीमुळे आर्थिक दुर्बल घटकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. गेल्या दोन वर्षापासून सुरू असलेल्या संशोधनाला जिद्द व आत्मविश्वासाने अखेर अथक परिश्रमातून त्यांच्या मेहनतीला फळ मिळाले आहे.

औषधनिर्माणशास्त्रज्ञ म्हणून सर्वसामान्यांच्या आरोग्याचा विचार करणे ही मी माझी नैतिक जबाबदारी मानतो. येत्या काळात भयानक आजारांपासून रु ग्णांना वाचविण्यासाठी सोईस्कर तसेच अधिक गुणकारी औषधे कशी बनवता येतील यावर पुढील संशोधनात आमचा भर असेल जेणेकरून सर्व थरांतील रु ग्णांना मदत व्हावी. -डॉ. योगेश उशीर, प्राचार्य