पंढरपूर : ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील निर्जला एकादशीनिमित्त विठ्ठल-रूक्मिणी मातेचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक पंढरपुरात दाखल झाले असून, यापैकी 45 हजार पददर्शन तर 6क् हजारांच्या आसपास भाविकांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले. दिवसभर अडीच लाख भाविकांची मांदियाळी पंढरीत होती.
निर्जला एकादशी ही भीमसेन या नावानेही ओळखली जाते. एकादशीनिमित्त महाराष्ट्राच्या कानाकोप:यातून भाविक पंढरीत दाखल झाले होते. भाविकांना रेल्वेचा प्रवास सोयीस्कर वाटल्याने, पंढरपूरला रेल्वेने येणो जादा पसंत केले. यामुळे रेल्वे स्थानकाकडून विठ्ठल मंदिराकडे भाविक जादा संख्येने येत होते. रविवारी सोलापूर बंद असल्याने सोमवारी सकाळी 1क् र्पयत एस.टी. वाहतूक नसल्याने प्रवाशांचे हाल झाले.
विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांनी रांग लावली होती. सकाळी दर्शनरांग विप्र दत्त घाटार्पयत पोहचली होती. मात्र सायंकाळी दर्शन रांगेने दर्शन मंडपाचे आठ गाळे भरले होते. विठ्ठलाला नेहमीप्रमाणो सर्व नित्योपचार करण्यात आले. तसेच विठ्ठलाच्या दर्शनासाठी होत असलेली वाढती गर्दी पाहून स्टेशन रोड व प्रदक्षिणा मार्गावर किरकोळ व्यापा:यांनी दुकाने थाटली होती.
रस्त्यावरील दुकानांमुळे व रस्ते विविध कामांसाठी खोदल्याने भाविकांना ये-जा करताना अडथळा निर्माण होत होता.
निर्जला एकादशीसाठी 4 हजार 5क्क् भाविकांनी ऑनलाईन विठ्ठलाच्या दर्शनासाठी बुकिंग केले होते. विठ्ठलाचे दर्शन घेऊन छोटय़ा दिंडय़ा प्रदक्षिणा मार्गावरुन फेरी मारुन जात होत्या. त्यामधील वारकरी जागोजागी भजन, कीर्तनामध्ये दंग झाले होते. (प्रतिनिधी)