शहरं
Join us  
Trending Stories
1
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
2
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
3
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
4
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
5
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
6
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
7
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
8
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
9
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
10
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
11
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
12
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान
13
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय
14
तिरुपती बालाजी: अत्यंत पवित्र असतो प्रसाद, खुद्द लक्ष्मीने केले होते लाडू; पाहा, मान्यता
15
संजय राऊतांनी दिला इशारा; पटोले म्हणाले, "त्यांचं फार ऐकत जाऊ नका"
16
Shakib Al Hasan चं ते 'मॅजिक; जाणून घ्या गळ्यातला काळा धागा चघळण्यामागचं त्याचं 'लॉजिक'
17
Exclusive: "मला हिंदी बिग बॉससाठी दोन वेळा विचारलं होतं, पण...", आर्या जाधवचा मोठा खुलासा
18
चिंताजनक! मोबाईलशिवाय जगण्याची भीती वाटते?; 'या' आजाराचा मोठा धोका, 'ही' आहेत लक्षणं
19
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
20
CRPF मध्ये नोकरीची संधी, ११ हजारांहून अधिक पदांसाठी भरती, पगारही मिळणार तगडा

विठ्ठला, शेतकरी कर्जमुक्त होऊ दे ! मुख्यमंत्र्यांचे विठ्ठलाला साकडे

By admin | Published: July 04, 2017 5:59 AM

देशात सर्वाधिक मोठी कर्जमाफी महाराष्ट्र सरकारने केली आहे, बा विठ्ठला, आता शेतकरी कर्जमुक्त होऊ दे ! असे साकडे राज्याचे मुख्यमंत्री

प्रभू पुजारी/ऑनलाइन लोकमतपंढरपूर, दि. 4 -  देशात सर्वाधिक मोठी कर्जमाफी महाराष्ट्र सरकारने केली आहे, बा विठ्ठला, आता शेतकरी कर्जमुक्त होऊ दे ! असे साकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विठ्ठलाकडे घातले.४ जुलै रोजी पहाटे २़२० वाजता आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक झाली. त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांसोबत विठ्ठलाची पूजा करण्याचा मान यंदा परसराम उत्तमराम मेरत व त्यांच्या पत्नी अनुसया मेरत यांना मिळाला. शासकीय महापूजा झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या मानाच्या वारकऱ्यांचा श्री विठ्ठल-रुक्मिणीची प्रतिमा, शाल, साडी आणि महाराष्ट्र परिवहन महामंडळाचा वर्षभरातचा मोफत पास व १५ हजार रुपयांचा धनादेश देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी स्वच्छता व पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर, कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, जलसंधारण मंत्री राम शिंदे, पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर, जलसंपदा, जलसंधारण व संसदीय कार्य राज्यमंत्री विजय शिवतारे, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्यासह श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे नूतन अध्यक्ष डॉ़ अतुल भोसले, गहिनीनाथ महाराज औसेकर, प्रवीण दराडे, शकुंतला नडगिरे, उल्हास पवार, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, जिल्हा पोलीस प्रमुख एस़ वीरेश प्रभू, मंदिर समितीचे व्यवस्थापक विलास महाजन, पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे, गायिका अनुराधा पौडवाल आदी उपस्थित होते़ मुख्यमंत्री म्हणाले, आळंदी ते पंढरी आणि देहू ते पंढरी पायी वारी म्हणजे सुख देणारा सोहळा असतो़ वारकरी मजल दर मजल करीत पांडुरंगाच्या दर्शनासाठी ओढीने झपाझप पाय टाकत पंढरीला येतात. भक्तीभावाने प्रेरित झालेली ही वारी असते़ भारत-कॅनडा मैत्रीचा करार झाला असून त्यांनी स्वत:हून पंढरपूरच्या विकासाला मदत करण्याची तयारी दर्शविली आहे़ त्यातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाल्यास पंढरीचा नक्कीच विकास होईल. याबाबचा प्रस्ताव त्यांच्याकडूनच आल्याने पंढरीचा महिमा आता परदेशातही झाल्याचे पाहावयास मिळत आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ३० जूनपर्यंत मंदिर समितीची स्थापना करण्यात आली आहे़ परंतु या समितीत केवळ दोनच वारकऱ्यांचा समावेश आहे़ त्यामुळे ही समिती बरखास्त करण्याची मागणी वारकरी संघटनेने केली आहे, मात्र ही समिती पूर्ण झाली नसून उर्वरित जागांमध्ये वारकऱ्यांचा नक्कीच समावेश केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले़निर्मल वारी यशस्वी केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी आणि कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांचे अभिनंदन केले़ फलटण ते पंढरपूर रेल्वे मार्गाबाबत भरीव आश्वासन दिले़ शिवाय नमामी चंद्रभागा हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी आणि चंद्रभागा प्रदूषणमुक्त होण्यासाठी नक्कीच प्रयत्न केले जातील, असे आश्वासन त्यांनी दिले.

लोकमतच्या महापूजेच्या तत्पर वृत्ताचं मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक
आषाढी एकादशीनिमित्ताने लोकमतने राज्यभरात प्रकाशित केलेले विठुरायची विलोभनीय प्रतिमा असलेले जॅकेट आणि पहाटेपर्यंत त्यांच्याच हस्ते सपत्नीक पहाटे तीनच्या सुमारास झालेल्या महापूजेचे सचित्र वार्तांकन पहाटेच पुढ्यात आल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रभावित झाले. डिजिटल मीडियात ऑनलाइन आवृत्तीच्या क्षणाक्षणाच्या अपडेट्सची माहिती पाहून अचंबित झाले. त्यांनी लोकमतच्या या तत्परतेबद्दल तोंड भरुन कौतुक केले. यावेळी टीम लोकमतच्या या कौतुकाचे साक्षीदार सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख, मंदिर समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ.अतुल भोसले व आ.प्रशांत परिचारक होते.