सचिन कांबळे
पंढरपूर : आषाढी यात्रेच्या सोहळ्यानिमित्त पुण्यातील एका भाविकाने श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात अआणि बाहेर एलईडी लाईट व रंगीत कापड्याच्या साहाय्याने आकर्षक सजावट केली आहे. त्यामुळे पंढरपूर नगरी सजल्याचे दिसून येत आहे.
श्री विठ्ठल-रुक्मिणीचा आषाढी यात्रासोहळा १२ जुलैला होणार आहे. या सोहळ्यानिमित्त प्रत्येक वर्षी मंदिराची सजावट करण्यात येत असते. श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान झाल्यानंतर पंढरपुरातील विठ्ठल मंदिराच्या सजावटीला सुरुवात करण्यात येते़ त्यानुसार पुणे येथे लाईट डेकोरेशनचा व्यवसाय करणारे नेरे (ता. मुळशी, जि. पुणे) येथील विनोद जाधव यांनी मंदिराची मोफत विद्युत रोषणाई केली आहे.
मंदिर परिसरावर, संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप या ठिकाणी विद्युत रोषणाई करण्यासाठी १६ कर्मचारी काम करत होते. यासाठी व्हाईट झुंबरचे १० नग, लाईटचे कंदील १६ नग, एल. ई. डी. पार्क १०० नग, एल. ई़ डी. मेटल पांढºया रंगाचे ३५ नग, वेगवेगळ्या रंगाचे ५० झुंबर, २०० लाईटच्या माळा, १०० एलईडी नवार पट्टे, २०० आर्टिकल, १५० फिक्सल नवार पट्टे, १० शारदी, २ एलईडी गेट आदींच्या साहाय्याने मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, संत तुकाराम भवन, संत ज्ञानेश्वर महाराज दर्शन मंडप, नामदेव पायरी या ठिकाणी या आकर्षक विद्युत रोषणाईमुळे रात्री लख्ख प्रकाशामुळे मंदिर परिसर उजळून निघत आहे़ मंदिर परिसरातीलही विद्युत रोषणाईची छबी भाविक आनंदाने मोबाईलमध्ये घेत आहेत. २७ जुलैपर्यंत विठ्ठल मंदिराला आकर्षक रोषणाई राहणार असल्याचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.
कळसांचे बदलतात रंगश्री विठ्ठल व रुक्मिणीच्या मंदिरावरील कळसाला एल. ई. डी. फिक्सल लाईट बसवण्यात आली आहे. या लाईटमुळे रात्रीच्या वेळी दोन्ही कळस वेगवेगळ्या सहा रंगात दिसत आहेत.
विविध मंदिरांमध्ये रंगबेरंगी कापडी सजावट- श्री विठ्ठल व रुक्मिणी सभागृहात, संत तुकाराम महाराज मठ, श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी स्थळ, पुंडलिक मंदिर, चौफाळा येथील कृष्ण मंदिरात रंगबेरंगी कापड लावून सजावट करण्यात आली आहे.
श्री विठ्ठल व रुक्मिणीमातेची सेवा करायची आहे. यात्रा कालावधीत मंदिराला मोफत आकर्षक रोषणाई करण्याबाबतची इच्छा मंदिर समितीच्या अधिकाºयांकडे केली होती. त्यानुसार त्यांनी मला सेवा करण्याची संधी दिली आहे.- विनोद जाधव, भाविक नेरे, ता. मुळशी, जि. पुणे