शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
2
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
3
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
4
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
5
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
6
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
7
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
8
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
9
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
10
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
11
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
12
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
13
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
14
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
15
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
16
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
17
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
18
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
19
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
20
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले

पुण्यातील विठ्ठल मंदिरे

By admin | Published: July 04, 2017 4:24 AM

वारकरी संप्रदायाचा एक प्रधान आराध्य देव म्हणून विठ्ठलाला-पांडुरंगाला अधिष्ठान आहे. महाराष्ट्र व कर्नाटकात प्राचीन काळापासून विठ्ठलाला

वारकरी संप्रदायाचा एक प्रधान आराध्य देव म्हणून विठ्ठलाला-पांडुरंगाला अधिष्ठान आहे. महाराष्ट्र व कर्नाटकात प्राचीन काळापासून विठ्ठलाला उपास्य दैवत म्हणून पुजले जाते. भारतीय भक्तिसंप्रदायांपैकी वैष्णव संप्रदायी विठ्ठलाला मनोभावे पुजतात. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम असे अनेक संतश्रेष्ठ या पंथात होऊन गेले. आजमितिलाही लाखो वैष्णव संप्रदायी आहेत. ते दर वर्षी आषाढी, कार्तिकी, माघी वा चैत्री यांपैकी एका शुद्ध एकादशीला गळ्यात तुळशीची माळ घालून नियमाने पंढरपुरास विठ्ठलाचे दर्शन घ्यायला जातात. पंढरपूरला महाराष्ट्रातील भक्तिसंप्रदायाचे आद्यपीठ मानले जाते. विष्णूचा अवतार असलेल्या श्रीकृष्ण आणि तस्वरूपी असलेल्या विठ्ठलाची भक्ती असलेले हे वारकरी एकादशी व्रत निष्ठेने करतात. या विठ्ठलरूपी श्रीहरीची पुणे शहरात सुमारे २० ते २२ मंदिरे आहेत. आषाढ शुद्ध एकादशीच्या निमित्ताने त्यातील काही निवडक मंदिरांचा परिचय...लकडी पूल विठ्ठल मंदिरपेशवाई आमदानीत झाशी येथील गृहस्थ जोतिपंतबुवा महाभागवत यांनी एकशेआठ मंदिरे बांधण्याचा संकल्प केला होता. लकडीपूल विठ्ठल मंदिर त्यांपैकीच एक आहे. पेशव्यांकडून या स्थानाला नंदादीपासाठी वार्षिक ३८ रुपये येत, अशी नोंद आहे. परंतु, सुटाबुटातील वेषात गणपती येथे बसविला म्हणून १९३९पासून हे वर्षासन बंद केले गेले. हे विठ्ठल मंदिर आकर्षक असून, देवासमोर पिंंड आहे. बाहेरच्या बाजूला चार मुखांचा पशुपतेश्वर आहे. मंदिरातील लक्ष्मी-नारायणाची संगमरवरी प्राचीन मूर्ती देखणी आहे. पालखी विठोबा मंदिर (भवानी पेठ)पुण्यातील व्यापारी पेठेत असल्याने अत्यंत गजबजलेले हे स्थान. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमहाराजांची आषाढ महिन्यात पंढरपूरला जाणारी पालखी मुक्कामासाठी या मंदिरात विसावते. या मंदिरांच्या बरोबरीनेच पर्वती गावातील विठ्ठल-रखुमाई मंदिर, नवी पेठेतील विठ्ठल मंदिर, लाल महालाजवळील विठोबाचे देऊळ, चित्रशाळा चौकातील केसकर विठोबा, खजिना विहीर येथील विठोबा मंदिर, मंडई येथील साखरेमहाराज मठाजवळील विठोबा, डुल्या मारुती विठोबा, कात्रज गावठाणातील प्रकाश कदम यांचे विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, मेहुणपुऱ्यातील जोशी वाड्यामधील विठोबा मंदिर ही पुण्यातील काही प्रसिद्ध विठ्ठल मंदिरे आहेत. पासोड्या विठोबा (बुधवार चौकांजवळ)पासोडी हे अंगावर पांघरायचे उबदार वस्त्र म्हणून पूर्वी प्रचलित होते आणि या पासोड्या विकणारे लोक व दुकाने मारुतीच्या मंदिराजवळ बसत म्हणून मारुतीला पासोड्या मारुती म्हणत व या मारुतीजवळील हे विठ्ठलाचे मंदिर म्हणून त्यालाही पासोड्या विठोबा हे नाव दिले. शिवाजीमहाराजांपासून अस्तित्वात असलेले हे मंदिर आहे. या ठिकाणी पूर्वी एक प्राचीन शिवलिंंग असलेली घुमटी व त्यासमोर पाण्याचा सार्वजनिक हौद होता, अशी नोंद इतिहासात सापडते. त्यावरून हे स्थान पेशवाईत शिवमंदिर होते. इंग्रजी अमलात येथे विठ्ठल-रखुमाईच्या प्रतिमांची स्थापना झाली. १९२८मध्ये जुन्या मंदिराचा जीर्णोद्धार झाला.निवडुंग्या विठोबा पुण्यातील जागृत स्थान. ‘पुण्याचे पंढरपूर’ असा मान या विठोबाला मिळालेला आहे. नाना पेठेत पूर्वी अनेक सधन गोसावी राहत. त्यांपैकी एकाने हे मंदिर बांधले. विठोबाच्या एका भक्ताला फड्या निवडुंगात विठ्ठलाची काळी पाषाणाची मूर्ती सापडली म्हणून त्याचे नाव निवडुंग्या विठोबा असे रूढ झाले. पुरुषोत्तमशेठ नावाच्या गुजराथी माणसाने मंदिराचा जीर्णोद्धार केला व १९२९मध्ये हे देवस्थान सार्वजनिक झाले. श्रीज्ञानेश्वर महाराज व चांगदेव यांच्या कथेवर आधारित संगमरवरी देखावा, चांदीचा गरुडखांब तसेच कै. सोनोपांत दांडेकर यांचा चांदीचा पुतळा ही या मंदिराची वैशिष्ट्ये आहेत. संत तुकाराममहाराज आणि त्यांचे गुरू आनंद चैतन्य यांची पालखी आषाढ महिन्यात पंढरपूरला जाताना येथेच मुक्काम घेत असल्याने या मंदिराला एक विशेष महत्त्व आहे.हडपसरमधील मंदिर जीर्णोद्धाराच्या प्रतीक्षेतहडपसर : हडपसर पंचक्रोशीतील प्रत्येक मंदिराला ऐतिहासिक महत्त्व आहे. त्यातील क्षेत्रपाल श्री काळभैरवनाथ महाराज मंदिर व विठ्ठल-रुक्मिणी मंदिर या दोन्ही मंदिरांचा जीर्णोद्धार व्हावा, अशी हडपसरमधील प्रत्येक नागरिक व भाविक यांनी मागणी केली आहे.या मंदिर जीर्णोद्धारामध्ये काळभैरवनाथ मंदिर बाजूची भिंत, नगारखाना, मंदिर प्रवेशद्वार, विहीर, महानंदी या सर्व गोष्टीचा जीर्णोद्धार व्हावा. या मंदिराचा एक वारसा आणि इतिहास, आधुनिकता या सर्व बाबींचा समावेश व्हावा, या ठिकाणी प्रत्येक महिन्याच्या अष्टमीला महाप्रसाद असतो. साधारण ३ हजार ते ४ हजार भक्तगण येतात.या मंदिराचा परिसर मोठा असल्यामुळे मंदिराशेजारील जागा शैक्षणिक, सांगीतिक या महत्त्वपूर्ण कार्यात सत्कारणी लावण्यात येऊ शकते. सुमारे ३५ किंवा ४० वर्षांपूर्वी याच मंदिरात अनेक विवाह सोहळे झाले आहेत. या मंदिराचा जीर्णोद्धार करताना अशा हॉलचा समावेश व्हावा, अशी भाविकांची मागणी आहे. यामुळे त्या ठिकाणी गरीब व सर्वसामान्य नागरिक यांचे विवाहसोहळे होतील. छोटे संस्कृतिक कार्यक्रम होतील. शैक्षणिक कार्यक्रम आखताना विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, सार्वजनिक ग्रंथालय असे उपक्रम राबविता येतील.सर्व नगरसेवक, आमदार, लोकप्रतिनिधींनी शक्य झाल्यास एकमताने निर्णय घेऊन या जीर्णोद्धाराच्या सत्कार्यात त्रिसदस्यीय समिती तयार करावी, बँक अकाउंट तयार करून निधी जमा करावा, हे काम जोमाने चालू करावे, असे निवेदन हडपसर प्रभाग समिती अध्यक्ष योगेश ससाणे यांना देण्यात आले आहे. या वेळी मुकेश वाडकर, योगेश हिंगणे, शेखर हिंगणे, विशाल हिंगणे, प्रशांत हिंगणे, ओंकार डांगमाळी, किरण हिंगणे, शुभम हिंगणे, अपुल हिंगणे, दिलीप भुजबळ, शुभम राऊत, महेंद्र बनकर यावेळी उपस्थित होते. ससाणे म्हणाले, की हडपसरमधील दोन्ही मंदिरांचा जीर्णोद्धार करून आधुनिकरीत्या व वारसा परंपरेने जपण्याचा प्रयत्न करू.रखुमाई-विठ्ठल देवस्थान (हिंंगणे गावठाण, कर्वेनगर)ृराजाराम पुलाजवळील हे मंदिर १९००मध्ये दगडू महादजी फेंगसे यांनी बांधले. नंतर शंकर देवस्थान ट्रस्टने सिद्धेश्वर मंदिर नदीकाठी बांधले. १९६१च्या पानशेत पुरामध्ये मंदिराची पडझड झाली; परंतु संरक्षक भिंंत राहिल्यामुळे शंकराच्या पिंंडीला धक्का पोहोचला नाही. मंदिराच्या प्रांगणात मोठी मोकळी जागा आहे. येथे शनी, मारुती आणि दत्ताचे मंदिर आहे. शेजारी पालव महाराजांची समाधी व सभामंडप आहे. मंदिरात वर्षभर भजन, कीर्तने, प्रवचने चालू असतात. प्रेमळ विठोबा या विठोबाची भक्ती करणाऱ्याला देवाच्या प्रेमळपणाची प्रचिती येते, अशी भाविकांची पूर्वीपासून श्रद्धा असल्याने त्याला ‘प्रेमळ विठोबा’ असे नाव पडले. सुमारे ११० वर्षे जुने असलेले हे मंदिर भीमाबाई देवकर यांनी बांधले. विठ्ठल हे श्रीकृष्णाचेच रूप; त्यामुळे मंदिरात श्रीकृष्णपत्नी राही आणि रुक्मिणी विठोबासोबत आहेत. राही-रुक्मिणी अशा प्रकारे क्वचितच दिसतात, हे वैशिष्ट्य. पश्चिमाभिमुखी अशा या मंदिराचा कोरीव लाकडी सभामंडप आकर्षक आहे.उपाशी विठोबा (भरत नाट्य मंदिर, सदाशिव पेठ)पुण्यातील एक महत्त्वाचे विठ्ठलाचे मंदिर. तीन पिढ्या सलग चालत आलेल्या उपासाच्या व्रतामुळे हा विठोबा ‘उपाशी विठोबा’ म्हणून कीर्ती पावला. सव्वादोनशे वर्षे जुन्या या मंदिराचा इतिहास मोठा रंजक आहे. पेशवाईच्या अखेरीस पुण्यातील गिरमे सराफांनी ते उभारले. गिरमे विठ्ठलभक्त; त्यामुळे दर वर्षी पंढरीची वारी करीत. वृद्धापकाळाने वारीला जाणे जमेना म्हणून त्यांनी सदाशिव पेठेतील कारकोळपुऱ्यातील जागा विकत घेऊन तेथे विठ्ठल मंदिर बांधले. नंतर विठ्ठलभक्तीमध्येच काळ व्यतीत करीत आहारही अत्यंत कमी केला. सकाळी थोडे वऱ्याचे तांदूळ, भुईमुगाचे दाणे आणि रात्री एक खारीक, एवढाच त्यांचा आहार होता. शुक्रवारात काळ्या हौदाजवळ राहणारे नाना गोडबोले रोज विठ्ठल मंदिरात भजन करीत. वृद्धापकाळी गिरम्यांनी गोडबोले यांना मंदिरात वास्तव्याला बोलावले. गोडबोल्यांनीही गिरम्यांचे उपासाचे व्रत स्वीकारले. गिरम्यांनी आपल्या माघारी गोडबोल्यांकडे मंदिर सुपूर्त केले. नाना गोडबोले कीर्तनकार होते. त्यांना गंगाधरबुवा काळे टाळ वाजवून साथ करीत. काळे यांना गोडबोल्यांनी आपल्या आयुष्याच्या अखेरीस मंदिराची मालकी सोपविली. काळ्यांनीही उपासाचे व्रत पुढे चालविले. ते ताक व लाह्यांचे पीठ खात. त्यांनी रामभाऊ साठे यांना सहकुटुंब मंदिरात भाडेकरू म्हणून ठेवले होते. काळ्यांच्या पश्चात साठे कुटुंबाकडे मंदिराची मालकी आली. अशा तऱ्हेने नात्याच्या नसलेल्या, परंतु विठ्ठलभक्ती या समान धाग्याने या तीन पिढ्या विठ्ठलाची सेवा करीत होत्या. अत्यंत निरिच्छ वृत्तीने या सर्वांनी मंदिराची मालकी उत्तराधिकाऱ्यांकडे सुपूर्त केली. अशा या तत्त्वनिष्ठ व्यक्तींमुळे उपाशी विठोबाला एक वेगळेच परिमाण लाभले आहे.