Vote for lokmat maharashtrian of the year 2019 nominations for best female actor theatre category
ज्यांच्या मनगटांत महाराष्ट्र आणि मुठीत विश्व अशा महारत्नांचा गौरव म्हणजे 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार' सोहळा. यंदा २० फेब्रुवारीला मुंबईत हा पुरस्कार सोहळा रंगणार आहे. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत, लोकसेवा, क्रीडा, राजकारण, शिक्षण, वैद्यकीय, सिनेमा, रंगभूमी या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या गुणीजनांचा सन्मान केला जाणार आहे. त्यातील रंगभूमी-स्त्री या गटासाठी पाच नामांकनं निश्चित करण्यात आली आहेत. त्यापैकी तुमच्या आवडत्या अभिनेत्रीला तुम्ही खालील बॉक्समध्ये मत देऊ शकता.
गौरी इंगवले - ओवी बालकलाकार गौरी इंगवले हिने २०१२ साली चित्रपटातून आपल्या अभिनय कारकीर्दीला सुरूवात केली. नुकतेच तिने ओवी या नाटकातून व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केले. २०१७ साली सादर झालेली ओवी ही एकांकिका आता दोन अंकी नाटकात रंगभूमीवर दाखल झाली आहे. निर्माते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या अश्वमी थिएटर्सने या नाटकाची निर्मिती केली असून बाल अभिनेत्री गौरी इंगवले आणि अभिनेत्री हेमांगी कवी यांच्या या नाटकात प्रमुख भूमिका आहेत.
हेमांगी कवी - ओवीहेमांगी कवीने नाटक, मालिका व चित्रपट अशा तिन्ही माध्यमात आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. २०१७ साली सादर झालेली ओवी ही एकांकिका आता दोन अंकी नाटकात रंगभूमीवर दाखल झाली आहे. निर्माते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या अश्वमी थिएटर्सने या नाटकाची निर्मिती केली असून बाल अभिनेत्री गौरी इंगवले आणि अभिनेत्री हेमांगी कवी यांच्या या नाटकात प्रमुख भूमिका आहेत. हेमांगीने आश्रम शाळेतील समिधा ताईची भूमिका रंगवली आहे. ओवी पाहिल्यानंतर रहस्यमय थरार प्रेक्षकांना अनुभवायला मिळत आहे.
कविता लाड - एका लग्नाची पुढची गोष्टप्रशांत दामले आणि कविता लाड यांची मुख्य भूमिका असलेले एका लग्नाची गोष्ट हे नाटक प्रचंड गाजले होते. या नाटकाचा पुढचा भाग म्हणजेच एका लग्नाची पुढची गोष्ट नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. लग्नाच्या अनेक वर्षांनंतर पती-पत्नीचे नाते कशा पद्धतीने बदलत जाते, त्यांच्यावर येणाऱ्या जबाबदाºयांमुळे त्यांचे नाते कसे बदलते हे सगळे हलक्या फुलक्या पद्धतीने या नाटकात मांडण्यात आलेले आहे. या नाटकाचे दिग्दर्शन अद्वैत दादरकरने केले असून यात कविता लाड यांनी मनिषा ही व्यक्तिरेखा साकारली असून या भूमिकेनं गृहिणीच्या मनाचा ठाव घेतला आहे.
मयुरी देशमुख -डियर आजो २०१८ मध्ये मयुरी लिखित व अभिनीत डिअर आजो हे नाटक रंगभूमीवर दाखल झाले. या नाटकात मयुरीने शानूची भूमिका साकारली आहे. या तरुण लेखिकेने लिहिलेले हे पहिलेच नाटक असून हे नाटक तिने अवघ्या बावीसाव्या वर्षी लिहिले आहे. मुळात या वयात इतक्या प्रगल्भ विषयावर एक अख्खे दोन अंकी व्यावसायिक नाटक तिने लिहिले याबद्दल मयुरीचे कौतुक आहे. मयुरी आजच्या तरुण पिढीतली आहे आणि त्यामुळे तिने आजच्या पिढीच्या साहित्याचा बाज या नाटकात वापरला आहे. डियर आजो अत्यंत हलकंफुलकं आणि मनोरंजक असले तरीही भावनिक ठेवण्यात यश मिळवले आहे. नातं म्हणजे काय दुधावरची साय असे कॅप्शन असलेले हे डियर आजो नाटक म्हणजे एका ओघाने एकट्या पडलेल्या आजोबाची आणि अचानक एकटी पडलेल्या नातीच्या नात्याची गोष्ट आहे.
तेजश्री प्रधान -तिला काही सांगायचंय तेजश्री प्रधान चे तिला काही सांगायचंय हे नाटक सध्या रंगभूमीवर गाजत आहे. या नाटकात तिने मितालीची भूमिका बजावत असून तिच्यासोबत आस्ताद काळे मुख्य भूमिकेत आहे. 'एक बंडखोर नाटक' अशी या नाटकाची टॅगलाइन असून नवरा बायकोमध्ये हाताळले जाणारे विषय या नाटकातून कोणताही संकोच न बाळगता स्पष्टपणे मांडले आहेत. मिताली सहस्त्रबुद्धे आणि यश पटवर्धन हे दोघे पती-पत्नी आहेत. यश कापोर्रेट क्षेत्रात वावरत आहे तर मिताली ही स्त्रीवादी संघटनेशी संबंधित आहे.