शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

Vote for LMOTY 2019: कोण आहे प्रॉमिसिंग राजकीय नेता? तुमचं मत कुणाला?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2019 8:26 PM

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराच्या माध्यमातून या व्यक्तिमत्त्वांचा गौरव करण्यात येतो. यावर्षीचा पुरस्कार सोहळा येत्या २० फेब्रुवारीला मुंबईत रंगणार आहे.

महाराष्ट्र ज्यांच्या मनात आहे आणि महाराष्ट्राचा झेंडा जे जगात फडकवताहेत, अशा दिग्गजांचा लोकमत वृत्तसमूह दरवर्षी सन्मान करतो. 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराच्या माध्यमातून या व्यक्तिमत्त्वांचा गौरव करण्यात येतो. यावर्षीचा पुरस्कार सोहळा येत्या २० फेब्रुवारीला मुंबईत रंगणार आहे. लोकसेवा, कला, क्रीडा, वैद्यकीय, उद्योग, राजकारण, प्रशासन अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांना यावेळी गौरवण्यात येणार आहे. त्यातील राजकारण-प्रॉमिसिंग या विभागासाठी पाच तरुण-तडफदार नेत्यांना नामांकन मिळालं आहे. त्यांच्यापैकी, तुम्हाला जो नेता पुरस्कारासाठी योग्य वाटतो, त्याला तुम्ही याच मजकुराच्या खालील बॉक्समध्ये मत देऊ शकता. सुरुवातीला या विभागात नामांकन मिळवलेल्या पाच नेत्यांची थोडक्यात माहिती.... 

आ. कपिल पाटील, प्रदेशाध्यक्ष, लोकतांत्रिक जनता दलः राजकीय वारसा असल्याशिवाय आमदार होता येत नाही, अशा समजुतीच्या काळात शिक्षक आई, वडिलांचा वारसा लाभलेले कपिल पाटील विधानपरिषदेत सलग तिसऱ्यांदा आमदार आहेत. कायदे करवून घेणारा अभ्यासू व लढाऊ आमदार म्हणून त्यांची ओळख बनली आहे. कपिल पाटील हे मूळचे समाजवादी कार्यकर्ते. राष्ट्र सेवा दल, छात्रभारती विद्यार्थी संघटना व समाजवादी चळवळीतून ते पुढे आले. कार्यकर्ता, पत्रकार ते आमदार असा त्यांचा प्रवास घडला. या तीनही भूमिकांत ते आजही वावरतात. मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर आंदोलन, मंडल आयोगाची अंमलबजावणी, मुस्लिम ओबीसी संघटना, सच्चर आयोगाची अंमलबजावणी, रात्रशाळा वाचविण्यासाठीचा लढा, अण्णांचे भ्रष्टाचारविरोधी आंदोलन अशा विविध चळवळीत ते सक्रिय राहिले. 

सचिन अहिर, राष्ट्रवादी काँग्रेस, मुंबई अध्यक्षःएक कामगार ते मंत्री असा सचिन अहिर यांचा प्रवास आहे. खटाऊ फॅब्रिक्स ग्रुपमध्ये कामगार असलेले अहिर संघटन कौशल्यामुळे पुढे कामगारांचे नेते बनले. आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे गेली २२ वर्षांपेक्षा अधिक काळ ते अध्यक्ष आहेत. महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघातही ते २२ वर्षांपासून कार्यरत आहेत. मुंबईसह महाराष्ट्र,आणि गुजरात बॉर्डरपर्यंत २५० कारखाना व आस्थापनातील कामगारांचे यशस्वी नेतृत्व ते करीत आहेत. मुंबईत बंद पडलेल्या गिरण्यांच्या कामगारांना त्यांनी कोट्यवधी रुपयांची देणी मिळवून दिली. महेंद्र अ‍ॅण्ड महेंद्र तसेच माझगाव डॉगसारख्या नामवंत कंपन्यांतील कामगारांचे नेतृत्व त्यांच्याकडे आहे.मुंबई राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ते चौथ्यांदा अध्यक्ष झाले आहेत. विधीमंडळातील उल्लेखनीय कामाबद्दल उत्कृष्ट संसदपटू म्हणून राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले आहे.

आमदार प्रशांत ठाकूर, रायगड भाजपा जिल्हाध्यक्षः‘आपल्या घरातील माणूस’ अशी प्रशांत ठाकूर यांची पनवेल शहरात ओळख बनली आहे. निवडणुकीपुरते राजकारण व इतर वेळी सर्वपक्षीयांशी सलोख्याचे संबंध ही त्यांची कार्यपद्धती मतदारसंघात वैशिष्ट्यपूर्ण ठरली आहे. खासदार रामशेठ ठाकूर हे त्यांचे वडील. त्यामुळे लहानपणापासूनच प्रशांत यांना राजकारणाची ओढ लागली. पनवेल नगरपरिषद ही त्यांची राजकारण आणि समाजकारणाची प्रयोगशाळा ठरली. २००६ मध्ये ते नगरसेवक म्हणून निवडून आले व नगराध्यक्षही झाले. २००९ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर ते विधानसभेत पोहोचले. २०१४ साली सायन-पनवेल महामार्गावर खारघर येथे सुरु झालेल्या टोलच्या विरोधात स्वपक्षाविरोधात त्यांनी आंदोलन केले. २०१४ सालची निवडणूक भाजपतर्फे लढवून ते दुसऱ्यांदा विधानसभेत गेले. नवी मुंबई जवळच्या पनवेल शहरात महापालिका करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. पनवेल महानगरपालिकेची २०१६ मध्ये पहिली निवडणूक ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भाजपने जिंकली. 

संजय राठोड, शिवसेना, महसूल राज्यमंत्री, यवतमाळःसामान्य शेतकऱ्याचा मुलगा ते राज्याचा महसूल राज्यमंत्री असा संजय राठोड यांचा प्रवास आहे. शिवसैनिक म्हणून त्यांनी राजकीय जीवन सुरू केले. गत तीस वर्षे ते या पक्षासोबत निष्ठेने आहेत. तीन वेळा ते आमदार झाले. केवळ आपला 'दिग्रस' हा मतदारसंघच नाही तर यवतमाळ जिल्ह्यात त्यांनी काम केले. २०१४ च्या निवडणुकीत सर्वाधिक मते घेणाऱ्या आमदारांत ते विदर्भात प्रथम तर राज्यात दुसऱ्या स्थानावर होते. लोकांना सहज उपलब्ध होणारा नेता अशी त्यांची जिल्ह्यात ओळख आहे. बंजारा समाजाचेही ते नेते आहेत. या समाजाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोहरादेवी (जि. वाशिम) येथे त्यांनी घेतलेल्या मेळाव्यास सुमारे २५ लाख बंजारा बांधव उपस्थित होते. 

सत्यजित तांबे, काँग्रेस, अहमदनगरःमहाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे हे महाराष्ट्रातील प्रमुख युवा नेत्यांपैकी एक. वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी ते राजकारणात आले. कुटुंबातून राजकीय वारसा असला तरी आपली स्वत:ची छबी निर्माण करण्यात ते यशस्वी झाले. विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी राज्यभर संघटन केले. २००२ मध्ये विद्यार्थी काँग्रेसचे ते राज्याचे सरचिटणीस झाले. २००७ मध्ये युवक काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी सक्रिय राजकारणाला प्रारंभ केला. दोन वेळा ते जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले. त्यावेळी नगर जिल्हा परिषदेत ग्रामीण समस्यांवर त्यांनी आवाज उठविला. २००७ ते २०१२ मध्ये युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आणि २०१२ नंतर सलग दोनवेळा प्रदेश उपाध्यक्ष म्हणून त्यांनी युवक काँग्रेसमध्ये काम केले. सप्टेंबर २०१८ मध्ये युवक काँग्रेसचे ते प्रदेशाध्यक्ष झाले.

टॅग्स :LMOTY 2019महाराष्ट्रीयन ऑफ द इअर 2019Maharashtraमहाराष्ट्र