परभणी : जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या ३० वर्षांपासून दबदबा असलेले दिग्गज नेते माजी मंत्री सुरेश वरपूडकर व माजी आ़ रामप्रसाद बोर्डीकर यांना मतदारांनी नाकारले असून, या दोन्ही काँग्रेस पक्षांच्या नेत्यांच्या उमेदवारांचा दारूण पराभव झाला आहे़ पाथरी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून पराभूत झालेले सुरेश वरपूडकर यांना याच मतदारसंघात १८ पैकी केवळ तीन जागेवर उमेदवार निवडून आणता आले़ तर जिंतूरमधून तीन वेळा निवडून आलेले रामप्रसाद बोर्डीकर यांना सेलू- जिंतूरमधील १५ पैकी एकाही जागेवर काँग्रेसचा उमेदवार निवडून आणता आला नाही़ राष्ट्रवादीचे आ़ विजय भांबळे यांनी बोर्डीकर यांच्या सर्वच उमेदवारांचा दारूण पराभव केला़गेल्या २५ वर्षांपासून जि़प़, पं़स़च्या निवडणुकीत वर्चस्व राखणाऱ्या जामकर कुटुंबीयांना यावर्षी पहिल्यांदाच जि़प़च्या बाहेर रहावे लागेल. माजी मंत्री स्व़ रावसाहेब जामकर यांचे नातू व माजी जि़प़ उपाध्यक्ष बाळासाहेब जामकर यांचे पूत्र संग्राम जामकर यांना काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तुकाराम रेंगे यांचे पूत्र बाळासाहेब रेंगे यांनी पराभूत केले़ भाजपाचे परभणी महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांच्या भावजय अक्षदा भरोसे यांच्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली सभा फोल ठरली असून, येथे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव यांच्या पत्नी अंजली आणेराव विजयी झाल्या आहेत़ रासपच्या युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ फड यांनी कोद्री गटातून भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढविली़ तरीही त्यांचा अपक्षकडून पराभव झाला़ (प्रतिनिधी)परभणीपक्षजागाभाजपा०५शिवसेना१३काँग्रेस०६राष्ट्रवादी२४इतर0६
वरपूडकर-बोर्डीकरांना मतदारांनी नाकारले
By admin | Published: February 24, 2017 4:54 AM