मुंबई : एच ईस्ट वॉर्डमध्ये राजकीय पक्षांकडून व्हॉट्अॅपचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. प्रत्येक प्रभागात करण्यात आलेली कामे आणि भविष्यात प्रभागात होणारे बदल याची माहीती व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून मतदारांमध्ये पोहोचलवली जात आहे. यात भाजप, शिवसेना आणि मनसे आघाडीवर आहे. एच ईस्ट वॉर्डमध्ये प्रभाग क्रमांक ८७ ते ९६ येतात. पालिका निवडणुकीचे बिगुल वाजताच या वॉर्डमधील सर्वच पक्षांनी मतदारांना गेल्या पाच वर्षात केलेल्या कामांची माहिती देण्यासाठी व्हॉट्सअॅपचा वापर सुरू केला आहे. पुनर्विकास, रस्त्यांची कामे, स्वच्छता, पाण्याची सोय, उद्यान इत्यादी माहिती मतदारांपर्यंत व्हॉट्सअॅपमार्फत पोहोचवण्यात येत आहे. शिवसेना, भाजप, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबरच सपाही यात आघाडीवर आहे. तर भाजप आणि शिवसेनेकडून गोळीबार परिसरातील संरक्षण मंत्रालयाच्या जागेवर असलेल्या झोपड्यांच्या पुनर्वसनाचा मुद्दा या उचलून धरण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
व्हॉट्सअॅपवरही आता निवडणूक प्रचाराची सुरुवात
By admin | Published: January 19, 2017 3:17 AM