लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील साडेसात हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी आठवडाभरापासून धडाडणाऱ्या प्रचाराच्या तोफा शुक्रवारी थंडावल्या आहेत. आता प्रतीक्षा प्रत्यक्ष मतदानाची असून रविवारी विविध जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींच्या सदस्यांसह थेट सरपंचपदाच्या निवडणुकांसाठी मतदान सुरु झाले आहे.
या ग्रामपंचायतींसाठी १८ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. नक्षलग्रस्त भागात दुपारी ३ वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. २० डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
जिल्हा व तालुकानिहाय ग्रामपंचायतीअहमदनगर- २०३, अकोला- २६६, अमरावती- २५७, औरंगाबाद- २१९, बीड- ७०४, भंडारा- ३६३, बुलडाणा- २७९, चंद्रपूर- ५९, धुळे- १२८, गडचिरोली- २७, गोंदिया- ३४८, हिंगोली- ६२, जळगाव- १४०, जालना- २६६, कोल्हापूर- ४७५, लातूर- ३५१, नागपूर- २३७, नंदुरबार- १२३, उस्मानाबाद- १६६, पालघर- ६३, परभणी- १२८, पुणे- २२१, रायगड- २४०, रत्नागिरी- २२२, सांगली- ४५२, सातारा- ३१९, सिंधुदुर्ग- ३२५, सोलापूर- १८९, ठाणे- ४२, वर्धा- ११३, वाशिम- २८७, यवतमाळ- १००, नांदेड- १८१ व नाशिक- १९६. एकूण- ७७५१.