मुंबई: राज्यातील २७ जिल्ह्यांतील १७३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १९ डिसेंबरला मतदान घेण्यात येणार आहे, तर मतमोजणी २१ डिसेंबरला होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली.या सर्व ग्रामपंचायतींची मुदत जानेवारी ते एप्रिल २०१६ या कालावधीत संपत आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे या सर्व ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात शनिवारी मध्यरात्री बारा वाजल्यापासून आचारसंहिता लागू होईल, तसेच निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल. सकाळी साडेसात ते सायंकाळी साड पाचपर्यंत मतदानाची वेळ असेल. गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी मात्र दुपारी तीनपर्यंत मतदानाची वेळ असेल. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून ३० दिवसांच्या आत उमेदवारांना निवडणूक खर्चाचा तपशील द्यावा लागेल. विहित मुदतीत खर्चाचा तपशील सादर न करणाऱ्या उमेदवारांविरुद्ध कारवाई केली जाईल, असेही सहारिया यांनी स्पष्ट केले. जिल्हानिहाय निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायती :ठाणे-३, रायगड-५, रत्नागिरी-५०, सिंधुदुर्ग-२, नाशिक-९, जळगाव-९, अहमदनगर-५, नंदूरबार-१, पुणे-२, सोलापूर- ११, सातारा- १३, कोल्हापूर- ४, औरंगाबाद-३, बीड-१, नांदेड- १२, परभणी-९, उस्मानाबाद-२, जालना-४, लातूर-२, हिंगोली-५, अमरावती-२, यवतमाळ-२, बुलढाणा-४, वाशीम-३,चंद्रपूर-१, भंडारा-४ आणि गडचिरोली-५. एकूण- १७३. निवडणूक कार्यक्र म निवडणूक नोटीस प्रसिद्धीचा दिनांक : २७ नोव्हेंबर २०१५नामनिर्देशनपत्रे देणे व स्वीकारणे : ३० नोव्हेंबर ते ४ डिसेंबर नामनिर्देशनपत्र छाननी : ५ डिसेंबर अर्ज मागे घेणे : ८ डिसेंबर चिन्हांचे वाटप : ८ डिसेंबर मतदान : १९ डिसेंबर मतमोजणी : २१ डिसेंबर
ग्रामपंचायतींसाठी १९ डिसेंबरला मतदान
By admin | Published: November 23, 2015 2:13 AM