मुंबई : विविध १८ जिल्ह्यांतील ८२ तालुक्यांमधील १,१६५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १३ ऑक्टोबरऐवजी आता १६ ऑक्टोबरला मतदान होईल. मतमोजणी १४ ऑक्टोबरऐवजी आता १७ ऑक्टोबरला होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली.
आयोगाने ७ सप्टेंबरला १,१६५ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यात सदस्यपदांसह थेट सरपंचपदाचाही समावेश आहे. सुधारित कार्यक्रमानुसार, १६ ऑक्टोबरला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल.
नक्षलग्रस्त भागात दुपारी ३ पर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी १७ ऑक्टोबरला मतमोजणीचे ठिकाण व वेळ संबंधित तहसीलदार जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने निश्चित करतील.