शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी उद्या मतदान

By admin | Published: February 02, 2017 7:55 PM

नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी शुक्रवार ३ फेब्रुवारीला मतदार होणार आहे.

ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि. 2 - नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी शुक्रवार ३ फेब्रुवारीला मतदार होणार आहे. नागपूर विभागातील शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची संपूर्ण तयारी झालेली आहे. मतदानासाठी विभागात १२४ मतदानकेंद्र निश्चित करण्यात आले असून यासाठी ६८० अधिकरी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ३५,००९ शिक्षक मतदार मतदानाचा हक्क बजावतील. सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. मतदानासाठी जांभळ्या रंगाचा विशेष पेन असून, मतदानाच्या वेळी मतदाराच्या उजव्या हाताच्या मधल्या बोटावर शाई लावण्यात येणार आहे. तसेच मतदारांना मतदानासाठी प्रशासनाकडून जांभळ्या रंगाच्या शाईचा विशेष पेन पुरविण्यात येणार आहे. मतदान नोंदणीसाठी याा विशेष पेनाचा उपयोग करायचा आहे. इतर पेनचा उपयोग केल्यास मतदान अवैध ठरणार आहे.- सेंट ऊर्सुला शाळेत होणार मतमोजणी६ फेब्रुवारी रोजी सेंट ऊसुर्ला शाळेत मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे. त्यापूर्वी ५ फेब्रुवारी रोजी सेंट ऊर्सुला गर्ल्स हायस्कुल येथे कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण होईल.- व्ही. एम. पाटील निवडणूक निरीक्षकनागपूर शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी एम.ए.डी.सी.चे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक व्ही.एम. पाटील यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय विभागीय आयुक्त अनूप कुमार हे निवडणूक निर्णय अधिकारी राहतील. तर जिल्हाधिकारी सचिन कुर्वे (नागपूर), जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी (भंडारा), जिल्हाधिकारी आशुतोष सलील (चंद्रपूर), जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे (गोंदिया), जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक (गडचिरोली) आणि जिल्हाधिकारी शैलेश नवाल (वर्धा) हे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी राहतील.असे आहेत उमेदवारअनिल दिनकरराव शिन्दे, चंद्र्रपूर (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), प्रकाश भगवंतराव जाधव, कन्हान (पारशिवनी) (शिवसेना), अरुण उर्फ रविंद्रदादा महादेवराव डोंगरदेव (बळीराजा पार्टी), राजेंद्र्र बाबुराव झाडे (शिक्षकभारती), आनंदराव येंकय्याजी अंगलवार, चंद्रपूर (अपक्ष), आनंदराव गोविंदराव कारेमोरे (विमाशि), खेमराज परसराम कोंडे, सुरगाव (उमरेड)(अपक्ष), प्रेम हरिदास गजभिये (अपक्ष), नागोराव पुंडलिक गाणार (महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद), चंद्रकांत गोहणे पाटील, नागपूर (अपक्ष), अजहर शफीउल्ला पठाण, नागपूर (अपक्ष), विलास शंकरराव बल्लमवार, गडचिरोली (अपक्ष), शेषराव नारायण बिजवार (अपक्ष), संजय चिंतामण बोंदरे (अपक्ष), अशोक वासुदेवराव लांजेवार (अपक्ष), अरुण निळकंठ हर्षबोधी (अपक्ष).एकूण १४ ओळखपत्रे ग्राह्यशिक्षक मतदारसंघ मतदानासाठी मतदारांना मतदान केंद्र्रावर भारत निवडणूक आयोगाच्या छायाचित्र मतदार ओळखपत्राशिवाय इतर १३ ओळखपत्रे मतदान करण्यासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. यात पारपत्र, वाहन परवाना, पॅनकार्ड, पदवी किंवा पदविका प्रमाणपत्र, शासकीय / निमशासकीय / सार्वजनिक उपक्रम विभागाचे सेवा ओळखपत्र तसेच यापुढील छायाचित्र असलेले बँक पासबूक, नोंदणीकृत दस्त, शिधापत्रीका, जातीचे प्रमाणपत्र, शस्त्र परवाना, अपंगत्वाचे प्रमाणपत्र, आधारकार्ड, एनपीआर अंतर्गत असलेले ओळखपत्र यांचा समावेश आहे, असे निवडणूक निर्णय अधिकारी शिक्षक मतदारसंघ तथा विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी कळविले आहे.जिल्हानिहाय मतदार व मतदान केंद्र-------------------------------------------------------------जिल्हा मतदार पुरुष महिला मतदान केंद्रनागपूर : १४,९७४ ८४१६ ६५५८ ४३भंडारा : ३,७२१ २८४२ ८७९ १२चंद्रपूर : ५६३८ ४३१० १३२८ २७वर्धा : ४२७९ २९४८ ११३१ १४गोंदिया : ३३२१ २६९७ ६२४ १०गडचिरोली : ३०७६ २६२५ ४५१ १८---------------------------------------------------------------एकूण : ३५,००९ २३,८३८ १११७१ १२४----------------------------------------------------------------