कोल्हापूर/सांगली/रत्नागिरी/सिंधुदुर्ग : जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे मंगळवारी चुरशीने मतदान झाले. मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदानाचा हक्क बजावला. काही ठिकाणी मतदान केंद्रांवर मशीन बिघाडाच्या घटना घडल्या.कोल्हापुरात इर्ष्येने ७५ टक्के मतदानकोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी अत्यंत इर्ष्येने सुमारे ७५ टक्क्यांपर्यंत मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान केंद्रांवर हुल्लडबाजी व त्यावरून पोलिसांनी लाठीमार केल्याच्या दोन घटना घडल्या तरी इतरत्र मात्र शांततेत ही प्रक्रिया पार पडली. दोन्ही काँग्रेस, भाजप व शिवसेना स्वतंत्र रिंगणात आहेत. जिल्हा परिषदेच्या ६७ जागांसाठी ३२२ तर पंचायत समितीच्या १३४ जागांसाठी ५८३ उमेदवार रिंगणात होते. जिल्ह्यात ११ लाख १२ हजार इतके पुरुष आणि महिलांचे १० लाख २५ हजार इतके मतदान आहे. सांगलीत ७२ टक्के मतदानजिल्हा परिषदेच्या ६० जागांसाठी २२५, तर पंचायत समितीच्या ११८ जागांसाठी ३६७, अशा ५९० उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. जिल्ह्यात किरकोळ वाद वगळता शांततेत सरासरी सुमारे ७२ टक्के मतदान झाले. गेल्या निवडणुकीत ७०.०७ टक्के मतदान झाले होते. यंदा निवडणुकीची टक्केवारी वाढली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गात सरासरी ६८ टक्के मतदानजिल्ह्यात ५५ जिल्हा परिषद गट आणि ११0 पंचायत समिती गणांसाठी सरासरी ६८ टक्के इतके मतदान झाले. संगमेश्वरमध्ये शिवसेना जिल्हाप्रमुखांसह १५ जणांविरूद्ध गुन्हा दाखल झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ५0 जिल्हा परिषद आणि १00 पंचायत समितीच्या जागांसाठी मंगळवारी सरासरी ६८ टक्के शांततेत मतदान झाले. गत वेळच्या निवडणुकीत सरासरी ६२ टक्के मतदान झाले होते. यावेळी मतदानाच्या टक्केवारीत सहा टक्क्यांनी वाढ झाली. आचरा व काही ठिकाणी किरकोळ बाचाबाची झाली. तर काही मतदान केंद्रावर मशिन बिघाडाच्या घटना घडल्या होत्या.दोन वृद्धांचा हृदयविकाराने मृत्यूरत्नागिरी : सुकिवली (ता.खेड जि.रत्नागिरी) येथे मतदानासाठी केंद्रावर गेलेले महादेव शिवराम चाळके (वय ६४) यांचा मतदान केंद्रातच मृत्यू झाला. ते सुमारे तासभर रांगेत उभे होते. मतदान केल्यानंतर बोटाला शाई लावतानाच ते खाली कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला. मुंबईमध्ये असणारे (साखरोली, ता.खेड) रहिवासी संतोष देवजी मोरे (४३) हे मतदानासाठी म्हणून मुंबईहून खेडकडे येत होते. पोलादपूर येथे बसमध्येच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली.
जि.प.,पं.स.साठी चुरशीने मतदान
By admin | Published: February 22, 2017 12:13 AM