शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
3
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
4
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
5
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
6
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
7
डायलॉग, टाळ्या, शिट्ट्या आणि पैसा वसूल! कसा आहे शरद केळकरचा ‘रानटी’? वाचा Review
8
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
9
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
10
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
11
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
12
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
13
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
14
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
15
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
16
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
17
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
18
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
19
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
20
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन

गिधाड जनजागृती दिवस : महाराष्ट्रात उरले केवळ आठशे गिधाड!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2020 4:30 AM

आधुनिक जटायूंच्या संवर्धनासाठी सरसावल्या स्वयंसेवी संस्था

- संदीप आडनाईककोल्हापूर - मेलेले प्राणी खाऊन स्वच्छतादूत म्हणून काम करणाऱ्या गिधाडांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. सध्या देशात साधारण १९ हजार, तर राज्यात केवळ ८०० गिधाडे आहेत. त्यामुळे रामायणात सीतेला वाचविण्यासाठी प्राणांची आहुती देणाºया गिध कुळातील जटायूला मिळालेला सन्मान आज पुन्हा मिळवून देण्याची गरज व्यक्त होऊ लागली आहे.१९९० ते २००९ या काळात जगभरात ९९ टक्के गिधाडे नष्ट झाली. रॉयल सोसायटी आॅफ प्रोटेक्शन आॅफ बर्ड (इंग्लंड), पेरिग्रीन (इस्रायल), बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (भारत) या संस्थांनी सर्वेक्षण केले. हा पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे लक्षात येताच आंतरराष्ट्रीय पातळीवरील काही संस्था आणि इंग्लंडच्या हॉक कॉन्झर्व्हेटरी ट्रस्ट यांनी संयुक्तपणे ५ सप्टेंबर २००९ रोजी ‘आंतरराष्ट्रीय गिधाड जनजागृती दिवस’ सुरू केला. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे डॉ. सचिन रानडे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार देशात १९ हजारांवर गिधाडे शिल्लक आहत. पांढºया पाठीची ६०००, लांब चोचीची १२,०००, तर पांढ-या गिधाडांची संख्या १००० पर्र्यंत उरली आहे.‘सिस्केप’ या संस्थेचे प्रेमकुमार मेस्त्री यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात नागपूर आणि कोकणात गिधाडांची घरटी शिल्लक आहेत. यामध्ये पांढ-या पाठीची सुमारे ६०० आणि लांब चोचीची सुमारे २००, अशी सुमारे ८०० गिधाडांची संख्या नोंदविली गेली आहे.महाराष्टÑात गिधाडांच्या संवर्धनासाठी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, कोकणात काम करणारी ‘सिस्केप’, भाऊसाहेब काटदरे यांची ‘सह्याद्री निसर्गमित्र,’ अ‍ॅनिमल वेल्फेअर बोर्ड आॅफ इंडिया, नाशिकचे इको इको फाऊंडेशन, पुण्यातील वाईल्ड लाईफ रेस्क्यू टीम काम करीत आहेत.जटायूला मिळालेला सन्मान पुन्हा मिळवून देण्याची गरजजगभरात २३, भारतात नऊ प्रजातीजगात गिधाडांच्या २३ आणि भारतात नऊ प्रजाती आढळतात. यामध्ये पांढºया पाठीची गिधाडे, लांब चोचीची गिधाडे, निमुळत्या चोचीची गिधाडे, इजिप्शियिन आणि युरेशियन ग्रिफन या गिधाडांचा समावेश आहे.35-40वर्षे इतके गिधाडांचे आयुष्यमान असते. एक जोडी वर्षाला साधारण एक अंडे घालून त्या पिलाचा सांभाळ करते आणि त्यापैकी फक्त50%पिले मोठी होतात.गिधाडे नष्ट होण्याची कारणे : डायक्लेफिनॅक औषधाचा जनावरांसाठीवापर, हरवलेला अधिवास, संसर्ग, पर्यावरणाचा ºहास, खाद्याची कमतरता आणिमानवी हस्तक्षेप यामुळे गिधाडांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. 

टॅग्स :environmentपर्यावरणNatureनिसर्ग