शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
3
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
4
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
5
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
6
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
7
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
8
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
9
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
10
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
11
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
12
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
13
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
14
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
15
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
16
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
17
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
18
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
19
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
20
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था

शेताच्या कुंपणात अडकली वाघीण

By admin | Published: January 08, 2015 1:18 AM

येथून जवळच असलेल्या मामला-बोर्डा शेतशिवारातील एका शेताच्या कुंपणामध्ये वाघीण अडकली. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस येताच एकच खळबळ उडाली. वाघिणीला निघता येत नसल्याने

शर्थीचे प्रयत्न : दोन तासानंतर काढण्यात वन विभागाला यशचंद्रपूर : येथून जवळच असलेल्या मामला-बोर्डा शेतशिवारातील एका शेताच्या कुंपणामध्ये वाघीण अडकली. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस येताच एकच खळबळ उडाली. वाघिणीला निघता येत नसल्याने ती सतत ओरडत होती. यामुळे बघ्यांनी एकच गर्दी केली. अखेर वन विभागाने शर्थीचे प्रयत्न करून तिला सुखरुप बाहेर काढले. बुधवारी पहाटे मामला-बोर्डा शेतशिवारातून वाघाच्या ओरडण्याचा आवाज आल्याने उत्सुकतेपोटी गावकऱ्यांनी शिवाराकडे धाव घेतली असता शेताच्या कुंपणामध्ये वाघ अडकलेला दिसला. अनेकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. वन विभागाला या संदर्भात माहिती मिळताच वन कर्मचाऱ्यांचा ताफा हजर झाला. मात्र नागरिकांच्या गर्दीमुळे त्यामुळे वन विभागाला काम करणे अशक्य झाले होते. अखेर पोलीस तथा दंगा नियंत्रण पथकाला पाचारण करावे लागले. उपसंचालक (बफर) नरवाणे, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य वनसंरक्षक बी. के. गरड आदींसह अन्य अधिकाऱ्यांनी भेट दिली. वाघिणीची तळमळ सुरु होती. मात्र जवळ जाण्याची हिंमत कुणाचीच होत नव्हती. तिला सोडविण्यासाठी वन विभागाच्या रेस्क्यू टीमने बराच काळ प्रयत्न केले. अखेर वन परिक्षेत्राधिकारी बलकी आणि डॉ. खोब्रागडे यांनी बधिरतेचे इंजेक्शन देऊन सोडविण्यात यश मिळविले. त्यानंतर पिंजऱ्यात बंद करून रामबाग नर्सरीत आणण्यात आले. सायंकाळच्या सुमारास शुद्धीवर आल्यावर तिने थोडा आहार घेतल्याची माहिती वन विभागाच्या सूत्रांनी दिली. सध्या तिची प्रकृती धोक्याबाहेर आहे. सकाळी ११ वाजताच्या सुमारास सुरू झालेले हे रेस्क्यू आॅपरेशन दुपारी दीड वाजेपर्यंत सुरु होते. फासातून निघण्याच्या प्रयत्नात ती कमरेमध्ये अडकली. मध्येच फसल्याने तिला मागेही येता येत नव्हते, अथवा पुढेही जाता येत नव्हते. सुटकेसाठी धडपड केल्याने वाघीण प्रचंड बिथरलेली होती. (प्रतिनिधी)