शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
3
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
4
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
5
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
6
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
7
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
8
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
9
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
10
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
11
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
12
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
13
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
14
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
15
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
17
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
18
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
19
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
20
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!

राम मंदिरावरुन आक्रमक झालेल्या शिवसेनेला आठवलेंचा सल्ला; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 7:49 PM

राम मंदिराच्या प्रश्नावर शिवसेना आक्रमक

मुंबई: अयोध्येतील राम मंदिराच्या मुद्द्यावरुन आक्रमक झालेल्या शिवसेनेला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी सबुरीचा सल्ला दिला आहे. राम मंदिराचा विषय सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे. त्यामुळे शिवसेनेनं न्यायालयाच्या निकालाची वाट पाहावी, असं आठवलेंनी म्हटलं. आगामी विधानसभा निवडणूक आरपीआय भाजपाच्या चिन्हावर लढणार नाही, या भूमिकेचादेखील त्यांनी पुनरुच्चार केला. जम्मू-काश्मीरसाठीचे ३७० कलम रद्द करताना केंद्र सरकारने जसे धाडसी पाऊल उचलले, तसेच पाऊल अयोध्येत राम मंदिराची उभारणी करण्यासाठी उचलत त्यासाठी कायदा करावा, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल पत्रकार परिषदेत केली. ते म्हणाले की, राम मंदिर हा आमच्या श्रद्धेचा आणि अस्मितेचा प्रश्न आहे. हा प्रश्न आम्ही सोडणार नाही. अयोध्येत राम मंदिरासाठी पहिली वीट लावण्याचे कामही आम्हीच करू, असं उद्धव यांनी म्हटलं होतं.राम मंदिराचा विषय १९९० पासून प्रलंबित आहे आणि तो अधिक काळ रेंगाळत ठेवता कामा नये. राम मंदिरासाठी आता थांबायला वेळ नाही. न्यायदेवतेनं लवकरात लवकर निर्णय द्यावा. निर्णय यायला उशीर लागत असेल, तर केंद्र सरकारनं विशेष कायदा तयार करावा. काश्मीर प्रश्नासाठी जसं धाडसी पाऊल उचललं, तसंच राम मंदिरासाठी धाडसी पाऊल उचलावं, अशी मागणी उद्धव यांनी केली होती. लोकसभा निवडणुकीच्या आधीही उद्धव यांनी राम मंदिराचा मुद्दा उपस्थित केला होता. पहले मंदिर, फिर सरकार अशी घोषणा देत त्यांनी अयोध्येलादेखील भेट दिली होती.  

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरUddhav Thackerayउद्धव ठाकरेRamdas Athawaleरामदास आठवलेShiv SenaशिवसेनाAyodhyaअयोध्या