अहमदनगर : पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथील दलितांच्या तिहेरी हत्याकांडातील तिन्ही आरोपींच्या डीएनए (डीआॅक्सोरायबो न्युक्लिक आम्ल) चाचणीच्या अहवालाची पोलिसांना प्रतीक्षा आहे. संबंधित अहवाल मिळविण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी गुजरातला रवाना झाले आहेत. अहवालानंतर आणखी काही आरोपी हाती लागण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.गेल्या आठवड्यात पाथर्डी येथील प्रथम वर्ग न्यायालयात तपास अधिकाऱ्यांनी सतराशे पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर खटला नगरच्या जिल्हा न्यायालयात वर्ग करण्यात झाला. त्याचवेळी तपास अधिकाऱ्यांनी आणखी काही आरोपींना अटक होण्याची शक्यता व्यक्त केली होती. आरोपी अशोक जाधव, दिलीप जाधव आणि प्रशांत जाधव यांची डीएनए चाचणी करण्यात आली. तिचा अहवाल अजून मिळालेला नाही. (प्रतिनिधी)आरोपींनी वापरलेले कपडे, त्यावरील रक्त, हत्याकांडातील आणखी आरोपींचा सहभाग याबाबत डीएनए चाचणीतून धागेदोरे सापडण्याची शक्यता आहे. - लखमी गौतम, पोलीस अधीक्षकसर्वाधिक काळ चालणारी तपास प्रक्रिया, संशयितांच्या मानसशास्त्रीय आणि वैज्ञानिक चाचण्या आदींनंतर तयार झालेला दस्तावेज पोलिसांसाठी मार्गदर्शक ठरला आहे.
‘डीएनए’ चाचणी अहवालाची प्रतीक्षा
By admin | Published: March 04, 2015 1:53 AM