शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

निकालासाठी प्रतीक्षा कायम

By admin | Published: August 04, 2014 12:50 AM

विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षेचे निकाल केव्हा जाहीर होणार हे अद्याप निश्चित नाही. विद्यापीठानेही याबाबत हात वर केले आहेत.

उन्हाळी परीक्षा : विद्यापीठाचे हात वरनागपूर: विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षेचे निकाल केव्हा जाहीर होणार हे अद्याप निश्चित नाही. विद्यापीठानेही याबाबत हात वर केले आहेत.शनिवारी यासंदर्भात विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, शिक्षक नसल्याने अडचणी येत आहे. विद्यापीठात विद्यार्थी आणि अभ्यासक्रमांची संख्या वाढली आहे. उत्तर पत्रिकांची संख्याही वाढली. मात्र त्या तुलनेत शिक्षकांची संख्या कमी आहे. परिणामी निकाल जाहीर होण्यास विलंब लागू शकतो. ही समस्या लवकरच दूर होईल. सर्व महाविद्यालयांना ५० टक्के शिक्षकांची पदे भरण्याचे आदेश दिले आहे.दरम्यान शिक्षकांच्या नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी महाविद्यालयांना पुरेसा वेळ देण्यात आला आहे. या काळात शिक्षक नियुक्त होईलच याबाबत खात्री नाही. महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४ नुसार ४५ दिवसाच्या आत निकाल जाहीर करणे बंधनकारक आहे. परंतु अनेक अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे निकाल दोन महिन्यापासून प्रलंबित आहेत. यासंदर्भात बोलताना देशपांडे म्हणाले की, आता ‘सेमिस्टर पॅटर्न’ लागू आहे. यात हा नियम लागू होत नाही. (प्रतिनिधी)शिक्षकांवर कारवाई का नाहीजून महिन्यात विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक विलास रामटेके यांनी उत्तर पत्रिका मूल्यांकन न करणाऱ्या शिक्षकांना नोटीस पाठविल्या होत्या व कारवाईचा इशारा दिला होता. मात्र एकाही शिक्षकावर कारवाई झाली नाही. याबाबत डॉ. देशपांडे यांना विचारणा केली असता त्यांनी त्यावर काहीही उत्तर दिले नाही.असा होणार परिणामउशिरा निकाल जाहीर होण्याचा फटका पुनर्मूल्यांकनालाही बसू शकतो. अद्याप हिवाळी परीक्षेच्या पुनर्मूल्यांकनाचे निकाल विभागाने जाहीर केले नाहीत. हिवाळी परीक्षांवरही याचा परिणाम होऊ शकतो. विशेषत: सेमिस्टर अभ्यासक्रमाच्या परीक्षांना याचा फटका बसू शकतो. निकाल लांबल्याने सर्वच सेमिस्टर अभ्यासक्रमाची परीक्षा डिसेंबरपर्यंत लांबू शकते. ही परीक्षा आॅक्टोबरमध्ये व्हायला हवी.