शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
5
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
6
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
7
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
8
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
9
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
10
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
11
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
12
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
13
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
15
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
16
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
17
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
18
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

महाराष्ट्राच्या यादीची प्रतीक्षाच; युती अन् आघाडीत जागा वाटप निश्चित होत नसल्याने पेच

By यदू जोशी | Published: March 09, 2024 6:30 AM

महायुतीमध्ये भाजप ३४ ते ३५ जागा लढणार असल्याच्या बातम्या आल्यानंतर मित्रपक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत १३ खासदार असताना त्याहीपेक्षा कमी जागा त्यांना मिळणार असल्याचे जे चित्र समोर आल्यामुळे चलबिचल आहे.

मुंबई : लोकसभेसाठी राज्यातील सत्तारूढ महायुती आणि विरोधातील महाविकास आघाडीला अद्याप एकही उमेदवाराच्या नावाची घोषणा करता आलेली नाही. त्यासाठी आणखी किमान दोन दिवस लागतील अशी शक्यता आहे. दोघेही एकमेकांच्या नावांचा अंदाज घेत आहेत. जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित होत नसल्याने घोडे अडले आहे. महायुतीतील तिन्ही पक्षांचे नेते रात्री दिल्लीत पोहोचले असून रात्री उशिरा फॉर्म्युला ठरेल व दोन दिवसांत घोषणा केली जाईल, असे म्हटले जात आहे. 

महायुतीमध्ये भाजप ३४ ते ३५ जागा लढणार असल्याच्या बातम्या आल्यानंतर मित्रपक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत १३ खासदार असताना त्याहीपेक्षा कमी जागा त्यांना मिळणार असल्याचे जे चित्र समोर आल्यामुळे चलबिचल आहे. मविआमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला २० हून अधिक जागा मिळणार असल्याचे चित्र असताना शिंदेंच्या शिवसेनेला महायुतीत त्याहून निम्म्याही जागा मिळणार नसतील तर भाजपसोबत जाण्याचा फायदा काय, असा सवाल आता शिंदे यांचे समर्थक आमदार, खासदार करीत आहेत. त्याचवेळी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला महाविकास आघाडीत मिळणार असलेल्या जागांपेक्षा दोन तरी अधिक जागा महायुतीत आपण घ्यायला हव्यात, असा दबाव राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्यावर वाढविला आहे.  

मविआचे जागा वाटपाचे घोडे वेगवेगळ्या कारणांनी अडले आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडी त्यांच्यासोबत जाणार की नाही हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्याने नांदेड, परभणी, हिंगोली, धाराशिवच्या जागांबाबत आधी घेतलेला जागा वाटपाचा निर्णय महाविकास आघाडीला बदलावा लागत आहे. 

भाजपचीही कसरत- भाजपला स्वत:चे चार ते पाच उमेदवार ठरविताना बरीच कसरत करावी लागत आहे. पक्षात काही धक्कादायक बदल असू शकतात. महाविकास आघाडीतील एकदोन बडी नावे कमळ हातात घेऊ शकतात. - मुंबईत तिन्ही खासदारांना संधी नाकारली जाण्याची शक्यता आहे आणि याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने आधीच दिले होते. उत्तर महाराष्ट्रातही अत्यंत महत्त्वाचे आणि अचंबित करणारे बदल घडू शकतात. 

टॅग्स :lok sabhaलोकसभाElectionनिवडणूकMahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस