पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या सेट परीक्षेचा मार्ग मोकळा झाला आहे. विद्यापीठातर्फे महाराष्ट्र व गोवा राज्यातील विद्यार्थ्यांची सेट परीक्षा येत्या जून महिन्यात होणार आहे. एका वर्षाहून अधिक काळापासून परीक्षेची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा दूर झाली आहे.सेट परीक्षा एका वर्षात दोन वेळा घेता यावी या दृष्टीने विद्यापीठ प्रशासनाने पाऊल उचलले होते. पुढील तीन वर्षांमध्ये कोणत्याही अडचणींशिवाय टप्प्या-टप्प्याने सलग सहा वेळा सेट परीक्षा घेण्याची परवानगी द्यावी, असा प्रस्ताव विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) समितीसमोर विद्यापीठातर्फे मांडला जाणार होता. त्यानुसार २0 फेब्रुवारी रोजी यूजीसीच्या समितीने विद्यापीठाला भेट दिली. विद्यापीठाने मांडलेला सहा परीक्षांचा प्रस्ताव समितीने मान्य केला असून, याबाबत यूजीसीकडे शिफारस करणार असल्याचे सांगितले आहे. परिणामी दर सहा महिन्यांनी सेट परीक्षा घेणे शक्य होणार आहे.
प्रतीक्षा संपली; ‘सेट’ जून महिन्यात
By admin | Published: February 24, 2015 1:35 AM