शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
5
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
6
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
7
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
8
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
9
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
10
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
11
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
12
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
13
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
14
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
15
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
16
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
17
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
18
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
19
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
20
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...

प्रतीक्षा दुसऱ्या यादीची

By admin | Published: June 26, 2015 2:41 AM

मुंबई महानगर क्षेत्रातील अकरावी आॅनलाइन प्रवेशाच्या पहिल्या कट आॅफ लिस्टमधील केवळ १ लाख १५ हजार १८८ विद्यार्थ्यांनी गुरुवारी शेवटच्या दिवशी

मुंबई : मुंबई महानगर क्षेत्रातील अकरावी आॅनलाइन प्रवेशाच्या पहिल्या कट आॅफ लिस्टमधील केवळ १ लाख १५ हजार १८८ विद्यार्थ्यांनी गुरुवारी शेवटच्या दिवशी प्रवेश कन्फर्म केले आहेत. त्यामुळे पहिल्या यादीतील १ लाख ८८ हजार १५८ विद्यार्थ्यांपैकी सुमारे ७० हजारांहून अधिक विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेतून बाहेर पडले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी प्रवेश कन्फर्म केले नसल्याने प्रवेशासाठी दुसऱ्या कट आॅफच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या आशा मात्र बळावल्या आहेत. अकरावी आॅनलाइन प्रवेशाची दुसरी कट आॅफ ३० जून रोजी सायंकाळी ५ वाजता लागणार आहे. दरम्यान, प्रवेश कन्फर्म न करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पाहता मोठ्या संख्येने यंदा जागा रिक्त राहणार असल्याचे निदर्शनास येते. त्याचा अप्रत्यक्ष फायदा दुसऱ्या आणि तिसऱ्या यादीच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांना होणार आहे. रिक्त जागांची संख्या पाहता दुसऱ्या यादीनंतर सर्वच विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्याची शक्यता आहे. इनहाऊस कोटा आणि अल्पसंख्यांक कोट्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रवेश कन्फर्म झाले नसल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.