शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

प्रतीक्षा ‘सुपर टॉप कॉप्स’च्या बदल्यांची!; एसीबी, एसआयडी, एलअँडओ’ची रिक्त पदे कधी भरणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 1:49 AM

अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर गृह विभागाने अखेर ८३ आयपीएस अधिकाऱ्यांसह १२० वरिष्ठ पोलीस अधिका-यांच्या बदल्या शुक्रवारी रात्री उशिरा केल्या.

- जमीर काझीमुंबई : अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर गृह विभागाने अखेर ८३ आयपीएस अधिकाऱ्यांसह १२० वरिष्ठ पोलीस अधिका-यांच्या बदल्या शुक्रवारी रात्री उशिरा केल्या. मात्र, राज्याचे पोलीसप्रमुख आणि मुंबईच्या आयुक्तानंतर महत्त्वाच्या समजल्या जाणा-या पदावरील पाच ‘सुपर टॉप कॉप्स’ना हात लावलेला नाही. विशेष म्हणजे यापैकी एका अधिका-याचा अपवाद वगळता अन्य अधिका-यांची दोन वर्षांची मुदत केव्हाच उलटून गेली आहे. त्याशिवाय लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी), राज्य गुप्तवार्ता विभाग (एसआयडी) व मुख्यालयातील कायदा व सुव्यवस्था विभागात (एल अ‍ॅण्ड ओ) अनेक महिन्यापासून पूर्ण वेळ प्रभारीपद नाही. त्यामुळे ही रिक्त पदे केव्हा भरणार, याकडे पोलीस वर्तुळाचे लक्ष आहे.आयपीएस अधिकाºयांच्या बढत्या व बदल्याबाबत विक्रमी विलंब झाल्यानंतर शुक्रवारी बदल्या करण्यात आल्या. मात्र ठाण्याचे आयुक्त परमबीर सिंग, पुण्याच्या आयुक्त रश्मी शुक्ला, नवी मुंबईचे हेमंत नागराळे, एसीबीचे प्रमुख विवेक फणसाळकर व एटीएसचे आयुक्त अतुलचंद्र कुलकर्णी यांची दोन वर्षांची मुदत संपूनही अद्याप त्यांना हलविण्यात आलेले नाही. या अधिकाºयांसह नागपूरचे आयुक्त डॉ. के. व्यंकटेशन, सीआयडीचे प्रमुख संजयकुमार, म्हाडाच्या दक्षता विभागाचे संजय वर्मा, ‘वेट्स अ‍ॅण्ड मेंजरमेंट’चे अमिताभ गुप्ता, कारागृह विभागाचे महानिरीक्षक डॉ.बी. के. उपाध्याय, राज्य वाहतुक महामार्ग विभागाचे प्रमुख आर. के. पद्मनाभन यांच्या लवकरच बदल्या होणे अपेक्षित आहे. यापैकी फणसाळकर यांची ठाण्याच्या आयुक्तपदी, शुक्ला यांची एसीबीला, पुण्याच्या आयुक्तपदासाठी अतुलचंद्र कुलकर्णी, नवी मुंबईसाठी संजयकुमार वर्मा तर १५ आॅगस्टपासून नव्याने कार्यान्वित होणाºया पिंपरी चिंचवडसाठी आर.के. पद्मनाभन यांच्या नावाची चर्चा आहे. त्यांच्या नियुक्तीचा विषय रविवारी दिवसभर चर्चेत होता, पण त्याचे आदेश मंत्रालयातून निघाले नव्हते.या महानिरीक्षकांना मुदतवाढदोन वर्षाचा कालावधी पूर्ण झालेल्या बहुतांश विशेष महानिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या असल्यातरी त्यातून मुंबईचे सहआयुक्त देवेनभारती, कोल्हापूर रेंजचे विश्वास नांगरे-पाटील, सायबर विभागाचे प्रमुख ब्रिजेश सिंग, मुख्यालयातील आस्थापना विभागातील राजकुमार व्हटकर, पीसीआरचे कैसर खलीद यांना मात्र मुदत पूर्ण होऊनही हलविण्यात आलेले नाही. यापैकी पीसीआर वगळता अन्य पोस्ंिटग महत्त्वाच्या असून याठिकाणच्या अधिकाºयांना आणखी काही कालावधीसाठी मुदतवाढ देण्यात आल्याचे सांगण्यात आले.या पदांना केव्हा पूर्णवेळ वाली ?लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील (एसीबी) महासंचालकपद दोन वर्षापासून रिक्त आहे, तर गुप्तवार्ता विभाग (एसआयडी)आयुक्तपद १४ मार्च २०१७ पासून मुख्यालयातील अप्पर महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) २१ डिसेंबर २०१७ पासून रिक्त आहे. या पदाचा अतिरिक्त कार्यभार अनुक्रमे विवेक फणसाळकर, संजय बर्वे व बिपीनबिहारी यांच्याकडून सांभाळला जात आहे.अप्पर महासंचालकांमध्ये नक्षलविरोधी अभियानाचे प्रमुख कनकरत्नम हे सर्वात ज्येष्ठ असून त्यांची निवड एसआयडी किंवा ‘एल अ‍ॅण्ड ओ’ला करता येऊ शकते. जर परमबीर सिंग यांची ‘एल अ‍ॅण्ड ओ’ ला नियुक्ती केल्यास कनकरत्नम यांना एसआयडीचे आयुक्तपद द्यावे लागेल, अन्यथा सेवाज्येष्ठतेचा वाद उद््भवून प्रकरण कोर्टात जाण्याची शक्यता आहे.कोणत्या अधिका-याचा किती कालावधी?परमबीर सिंग (तीन वर्षे ४ महिने १३ दिवस)रश्मी शुक्ला (दोन वर्षे ४ महिने)हेमंत नागराळे (दोन वर्षे २ महिने१७ दिवस)विवेक फणसाळकर (दोन वर्षे दोन महिने ३दिवस)अतुलचंद्र कुलकर्णी (दोन वर्षे दोन महिने ३दिवस)अमिताभ गुप्ता (दोन वर्षे सहा महिने २४ दिवस)डॉ. व्यंकटेशन (एक वर्षे अकरा महिने ३ दिवस)

टॅग्स :Policeपोलिस