शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

समृद्धी महामार्गासाठी मुद्रांक शुल्क माफ

By admin | Published: June 30, 2017 1:26 AM

राज्याच्या गतिमान विकासासाठी होणाऱ्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाला मुद्रांक शुल्क माफ करण्याचा

यदु जोशी। लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्याच्या गतिमान विकासासाठी होणाऱ्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाला मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य शासनाने गुरुवारी घेतला. आता सोमवारपासून या महामार्गासाठी आवश्यक असलेल्या जमिनींची खरेदी शेतकऱ्यांकडून करण्यात येणार आहे. आजवर राज्यात कोणत्याही प्रकल्पाला दिला गेला नाही, एवढा आर्थिक मोबदला भूसंपादनासाठी देण्यात येणार आहे. पूर्व-पश्चिम अशा या महामार्गाला राज्य वा राष्ट्रीय महामार्ग ज्या ठिकाणी दक्षिण-उत्तर छेद देतात त्या ठिकाणी टाऊनशिप उभारण्यावर राज्य रस्ते विकास महामंडळाने भर दिला आहे. या महामार्गामध्ये २४ नवनगरांची (टाऊनशिप) उभारणी करण्यात येणार असून त्यातील १५ जागा आता निश्चित करण्यात आल्या आहेत. ही सर्व कृषी समृद्धी केंद्रे असतील. त्यांच्या उभारणीमुळे कृषी माल काही तासांत मुंबईच्या बंदरात आणि त्यानंतर जगाच्या बाजारपेठेत पोहोचू शकेल. या १५ टाऊनशिपसंदर्भातील अधिसूचना नगरविकास विभागाचे उपसचिव संजय सावजी यांनी काढली असून नागरिकांकडून हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत.या टाऊनशिपमध्ये लॅण्डपुलिंग फॉर्म्युलाने किंवा खासगी सहभागानेही उभारणी करता येईल. वर्धा जिल्ह्याच्या आर्वी तालुक्यातील बीड नाकझरी, बोरी, खानापूर (अंशत: क्षेत्र), मानकापूर, नागाझरी, रामपूर (अंशत: क्षेत्र) आणि रेनकापूर ही गावे टाऊनशिपमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा व देऊळगावराजा तालुक्यातील सावरगाव माळ, निमखेड, गोळेगाव या गावांचा समावेश असेल. बुलडाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यातील गावंडळा, काबरा, साबरा, फैजलपूर आणि भूमुरा ही गावे मिळून टाऊनशिप बनेल. बाजूच्या जालना जिल्ह्यात जामवाडी, गुंडेवाडी आणि श्रीकृष्णनगर यांची एक टाऊनशिप बनणार आहे. ठाणे जिल्ह्यातील कासगाव, सापगाव, शेलवली आणि खुटघर मिळून टाऊनशिप उभारली जाईल. याच तालुक्यात मौजे फुगळे आणि मौजे वाशाळा यांची दुसरी तर मौजे हिव आणि मौजे रास यांची तिसरी टाऊनशिप होईल. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यामध्ये वडगाव बक्षी, हळदगाव, भानुसली व सावंगी गावांमिळून टाऊनशिप होणार आहे. इतर टाऊनशिप अशा - अमरावती जिल्हा : धामणगाव तालुक्यातील दत्तापूर, जळगाव आर्वी, नारगवंडी, आसेगाव. वाशिम जिल्हा - कारंजा तालुक्यातील शाहा, वाल्हाई, भिलखेडा. मालेगाव तालुक्यातील रिधोरा, सुकांदा, वारंगी, ब्राह्मणवाडा. मंगरूळपीर तालुक्यातील वानोजा, पर. औरंगाबाद जिल्हा - वैजापूर तालुक्यातील घायगाव, जांभरगाव. याच तालुक्यातील हडस पिंपळगाव, करंजगाव, लासूरगाव, शहजतपूर. बाबतार, लाख. अहमदनगर जिल्हा - कोपरगाव, राहाता तालुक्यातील सावळी विहीर, चांदे कासारे. यातील बऱ्याच गावांची अंशत: जमीन सदर टाऊनशिपसाठी वापरण्यात येणार आहे.