ऑनलाइन लोकमतवाशिम, दि. 30 - वाशिम नगरपरिषदेच्या वतीने विविध उपाययोजना राबवून उघड्यावरील हागणदारीला रोख देण्याचा प्रयत्न केला आहे. ३० डिसेंबर रोजी शहरातील मुख्य रस्त्यावर, चौकामध्ये गत दोन दिवसांमध्ये उघडयावर शौचास जाणाऱ्यांचे छायाचित्र काढून मोठया फलकाव्दारे लावण्यात आले आहे. केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गंत राज्यात मागील दोन वर्षांपासून अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानानुसार वाशिम शहर ३१ मार्च २०१७ पर्यंत हागणदारीमुक्त करण्याच्या उद्देशाने व तसे शासनाचे आदेश असल्याने नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गणेश शेटे यांनी आता उघडयावर शौचास जाणाऱ्यांचे फोटो शहरातील प्रमुख चौकात लावण्याचा निर्णय घेवून तसे शहरातील नागरिकांना शहरात भोंगा फिरवून सुचित केले होते, तसेच रेडिओवरुनही याबाबत मुख्याधिकारी गणेश शेटे यांनी जागृती केली होती. त्यानंतरही काही नागरिक उघडयावर आढळल्याने त्यांचे छायाचित्रे काढून आज शहरातील चौकाचौकात लावण्यात आल्याने नागरिक आतुरतेने ते पाहत आहेत. या प्रकारामुळे अनेकांनी उघडयावर शौचास न जाता शौचालय बांधण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे उघडयावर शौचास जाणाऱ्यांकडून सांगण्यात योत असल्याचे पथकातील कर्मचाऱ्यांच्यावितने सांगण्यात आले आहे. वाशिम शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी वाशिम नगरपरिषदेकडून एकूण ३६७० लाभार्थ्यांना शौचालय बांधकाम करण्याकरीता अनुदान देण्यात आलेले आहे, त्यापैकी ११६९ लाभार्थ्यांनी शौचालयांचे बांधकाम पूर्ण केले आहे. या संदर्भात नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी माहिती देतांना सागिंतले की, शहरातील सर्व शाळेतील मुख्याध्यापकांचा आढावा सभा, बचत गटातील महिलांची आढावा सभा घेवून त्यांना मार्गदर्शन करण्यात आले आहे. सदर उपक्रम नियमित राबविल्यास याचा चांगला फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
उघडयावर शौचास जाणाऱ्यांचे चौकात झळकले फलक!
By admin | Published: December 30, 2016 7:18 PM