शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

वाळूमाफियांचा श्रीवर्धनमध्ये हल्ला

By admin | Published: May 23, 2015 1:20 AM

बेकायदा वाळू उत्खनन सुरू असताना वाळूमाफियांना रंगेहाथ पकडणाऱ्या पोलीस व महसूल अधिकाऱ्यांवरच त्यांनी हल्ला केल्याचा प्रकार गुरुवारी दुपारी घडला आहे.

अलिबाग (जिल्हा - रायगड) : श्रीवर्धन तालुक्यातील कारीवणे खाडीत बेकायदा वाळू उत्खनन सुरू असताना वाळूमाफियांना रंगेहाथ पकडणाऱ्या पोलीस व महसूल अधिकाऱ्यांवरच त्यांनी हल्ला केल्याचा प्रकार गुरुवारी दुपारी घडला आहे. कारीवणे खाडीत ही धरपकड सुरू असताना जमावाने धक्काबुक्की करून पोलीस अधिकाऱ्यांना मारहाण करीत त्यांनी ताब्यात घेतलेल्या सात जणांना सोडण्यास भाग पाडले. श्रीवर्धन पोलीस व तहसीलदार कार्यालयाच्या माध्यमातून टाकण्यात आलेल्या या संयुक्त छाप्याच्या कारवाईदरम्यान वाळू उद्योगाचा प्रमुख मोबिन हसीन परकार याने जमाव जमवून कारवाईस गेलेल्या साहाय्यक पोलीस निरीक्षक रामा धोंगडा व पुरवठा निरीक्षक बी. एस. कुळकर्णी यांच्यासह कर्मचाऱ्यांवर हल्ला चढविला व ताब्यात घेतलेल्या सात जणांना पोलीस रखवालीतून पळून जाण्यास मदत केली. या प्रकरणी तसेच भारतीय पर्यावरण संरक्षण अधिनियम व जिल्हाधिकाऱ्यांच्या रेतीबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी श्रीवर्धन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या संयुक्त कारवाईत सक्शन पंपासह दोन बोटी, तीन रेतीने भरलेल्या बोटी, सहा व आठ ब्रास रेतीचे ढीग, एक जेसीबी असे बेकायदा रेतीसह तब्बल १९ लाख ५५ हजार रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. पोलीस व महसूल अधिकारी व कर्मचारी यांच्यावर करण्यात आलेल्या हल्ल्याची माहिती मिळताच श्रीवर्धन येथील साहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी कारवाईच्या सूचना दिल्या आहेत.या प्रकरणी वाळूमाफिया मोबिन हसीन परकार, अमजत शेख, अनवर कलंदर सवेल, मन्नमान रहमरण शेख, सादिक उस्मान परकार, सनहुत दिसकार अलिशेख आणि नकसिंग अर्जुन पोमले या सर्व सापोले (बाणकोट) येथील सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे. (विशेष प्रतिनिधी)च्या हल्ल्याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांचा शोध श्रीवर्धन पोलीस घेत आहेत. रायगडचे नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक मो.सुवेज हक यांनी जिल्ह्यातील बेकायदा उद्योगांवर कठोर कारवाईचे संकेत गेल्या दोन दिवसांपूर्वी दिले होते. त्या संकेतांच्या पार्श्वभूमीवर श्रीवर्धन पोलिसांनी केलेली ही मोठी कारवाई आहे.