शहरं
Join us  
Trending Stories
1
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
4
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
6
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
7
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
8
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
9
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
10
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
11
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
12
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
13
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
14
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
15
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
17
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
18
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
19
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
20
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण

कुस्तीच्या फडात घुमतोय खान्देश कन्येचा शड्डू!

By admin | Published: February 13, 2017 3:57 AM

शहरातील नामांकित मल्ल चंद्रकांत (नाना) सैंदाणे यांनी कुस्तीची परंपरा पुढे चालविण्यासाठी मुलगी हर्षालीला प्रशिक्षण दिले. अहोरात्र कष्ट करुन

अनिल मकर / धुळेशहरातील नामांकित मल्ल चंद्रकांत (नाना) सैंदाणे यांनी कुस्तीची परंपरा पुढे चालविण्यासाठी मुलगी हर्षालीला प्रशिक्षण दिले. अहोरात्र कष्ट करुन हर्षालीनेही ही कला आत्मसात केली.धुळ्याचे नाव राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचविणारी खान्देशची कन्या असा तिचा आज लौकिक आहे.सैंदाणे यांची घरची परिस्थिती बेताचीच आहे. वडिलांप्रमाणे आपणही पैलवान व्हावे या इच्छेने हर्षालीने आपल्या पित्याकडे मल्लविद्या शिकविण्याचा हट्ट धरला. तिचा ठाम निश्चय पाहून त्यांनी तिला मल्लविद्येचे धडे देण्यास सुरुवात केली. सुरवातीला जवळच्या लोकांनीही त्यांना हिणविले. परंतु कोण काय म्हणतो याची तमा न बाळगता या पित्याने मुलीचा सराव चालूच ठेवला.चंद्रकांत सैंदाणे यांना दोन मुलीच आहेत. याची त्यांनी कधी खंत बाळगली नाही किंवा मुलगा-मुलगी असा भेदही केला नाही. दररोज पहाटे चार-साडेचार वाजता मुलीचा व्यायाम घेणे, धावणे, दोर चढणे, कसरत, खुराक आणि कुस्तीतील डावपेच शिकविण्याचे काम ते करत आहेत. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्यावतीने २०१० मध्ये धुळ्यात महिला कुस्ती स्पर्धा पार पडल्या. त्यामध्ये सैंदाणे यांनी धुळ्यातून सात मुलींना आखाड्यात उतरविले. या स्पर्धेत सलामीची कुस्ती हर्षालीची झाली. मुंबईच्या मुलीला दोन मिनिटात तिने चितपट केले.तेव्हापासून हर्षालीने कधी मागे वळून पाहिलेच नाही. मॅटवरची कुस्ती असो अगर लाल मातीवरील चांगल्या-चांगल्या महिला मल्लांना तिने चितपट केले. कोलंबो (श्रीलंका) येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशीप स्पर्धेत सुवर्णपदकही पटकावले. तर राज्यस्तरावर पाच वेळा कांस्यपदके प्राप्त केली. सध्या ती २१ फेब्रुवारी रोजी शिरसा (हरियाणा) येथे होणाऱ्या अखिल भारतीय विद्यापीठ कुस्ती स्पर्धेत तसेच लंडन येथे होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियन स्पर्धेसाठी मध्यप्रदेशातील भोपाळ येथे कसून तयारी करत आहे.