शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
3
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
4
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
5
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
6
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
7
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
8
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
9
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
10
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
11
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
12
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
13
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
14
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
15
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
16
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
17
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
18
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
19
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
20
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा

भटकता आत्मा, मोदींची ऑफर अन् बिनशर्त पाठिंबा; लोकसभा निवडणुकीचा फड राज्यात गाजला

By यदू जोशी | Published: May 21, 2024 9:42 AM

जातीपातीचे राजकारणही होते जोरात, पाचव्या टप्प्यातही वर्चस्वासाठी जोरदार चुरस 

यदु जोशी -

मुंबई : पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नाव न घेता महाराष्ट्रातील भटकता आत्मा असा केलेला उल्लेख, शरद पवार, उद्धव ठाकरेंना एनडीएसोबत येण्याची त्यांनी दिलेली ऑफर, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला दिलेला बिनशर्त पाठिंबा अशा रंजक विषयांनी राज्यात लोकसभा निवडणुकीचा फड गाजला. 

मोदींच्या भटकता आत्मा या शब्दावर शरद पवार यांनी, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी माझा आत्मा नेहमीच भटकत राहील. मी स्वत:साठी अस्वस्थ नाही तर महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न याबाबत अस्वस्थ आहे, असे प्रत्युत्तर दिले. 

पंतप्रधान मोदींची गुगली‘उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत व उद्या संकट आले तर त्यांच्या मदतीला मी धावून जाईन’ असे विधान नरेंद्र मोदी यांनी दि. ३ मे रोजी एका मुलाखतीत केले. त्यावरून मोदी हे ठाकरेंशी जुळवून घेत तर नाहीत ना, अशी शंका निर्माण झाली. मात्र आपण मोदींच्या दारात कधीही जाणार नाही, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.

शरद पवार यांचे ‘ते’ विधानलोकसभा निवडणुकीनंतर अनेक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असे विधान ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी एका मुलाखतीत केले. काँग्रेस आणि आमची विचारसरणी एकच असल्याचे सांगत त्यांनी आपल्या पक्षाचे काँग्रेसमध्ये विलीनीकरणाचे संकेत दिले का, अशी चर्चा सुरू झाली. पंतप्रधान मोदींनी त्यांना अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षात आणि पर्यायाने एनडीएसोबत येण्याची ऑफर दिली. त्यावरूनही आरोप-प्रत्यारोप रंगले.

जातीपातीच्या जाणिवांनी या निवडणुकीत कधी नव्हे एवढे डोके वर काढले. विशेषत: मराठवाड्यात त्याचा प्रत्यय आला. विदर्भात डीएमके म्हणजे दलित-मुस्लीम-कुणबी या समीकरणाची चर्चा राहिली. 

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेत  महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्याची घोषणा केली. 

निवडणुकीतील प्रमुख घटना- मोहिते पाटील घराण्याने भाजपचा हात सोडून शरद पवार यांचा हात धरला. - नाशिकच्या महायुतीच्या जागेवरून सर्वाधिक घोळ घातला गेला. उमेदवारी न मिळाल्याने छगन भुजबळ यांची नाराजी शेवटपर्यंत कायम असल्याचे चित्र होते.- ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीशी चर्चा तर केली; पण नंतर स्वतंत्र लढले. - उद्धवसेनेच्या प्रचारगीतातील जय भवानी आणि हिंदू शब्द वगळण्यास निवडणूक आयोगाने सांगितले. त्याला आव्हान देणारी उद्धवसेनेची याचिका आयोगाने फेटाळून लावली.- पंतप्रधान मोदी यांनी राज्यात तब्बल १८ सभा घेतल्या, मुंबईत रोड शो केला. - कांदा निर्यातबंदीच्या मुद्द्यावरून कांदा पट्ट्यात राजकारण तापले.  

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीSharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेRaj Thackerayराज ठाकरे