जर तुम्हाला बाजारभावापेक्षा कमी किंमतीत घर, दुकान किंवा अन् संपत्ती घ्यायची असेल तर एसबीआय(SBI) मोठी संधी घेऊन आली आहे. ही संधी ३० डिसेंबरपर्यंत उपलब्ध असणार आहे. तुम्ही लिलावात सहभाग घेऊन कमी किंमतीत मालमत्ता खरेदी करू शकता.
SBI ने कर्ज चुकते करू न शकलेल्या म्हणजेच डिफॉल्टर ग्राहकांची संपत्ती लिलावात विक्रीला काढली आहे. या लिलावात निवासी फ्लॅट, घरे, व्यावसायिक गाळे आणि औद्योगिक जमिनी आहेत. या त्या लोकांच्या मालमत्ता आहेत जे काही कारणास्तव घेतलेले कर्ज फेडू शकले नाहीत. या मालमत्तांवर आता बँकेचा ताबा असून ई लिलावातून तुम्ही अशा मालमत्ता खरेदी करू शकणार आहात. यामध्य़े महाराष्ट्रातील नागपूर, ठाणे आणि औरंगाबादच्याही मालमत्ता आहेत.
या मालमत्ता कर्जदारांनी गहाण ठेवलेल्या किंवा जामिनदारांच्या जप्त केलेल्या आहेत. बँकेचे पैसे यामध्ये अडकलेले आहेत. यामुळे या मालमत्ता लिलावात विकून बँक आपला पैसा वसूल करणार आहे. स्टेट बँकेनेच याची माहिती ट्विटकरून दिली आहे.
या लिलावात देशातील कोणत्याही कानाकोपऱ्यातील मालमत्ता खरेदी केली जाऊ शकते. SBI वेळोवेळी असे लिलाव आयोजित करत असते. पारदर्शक पद्धतीने लिलाव केला जातो, असा दावा एसबीआयने केला आहे. लिलावाच्या आधी दिलेल्या माहितीत खरेदीदाराला मालमत्तेचे आवश्यक डिटेल्स दिले जातात. लिलाव प्रक्रियेत भाग घेण्याआधी बँकेकडून मालमत्तेचे लोकेशन, साईज आदी माहिती घेता येते. यासाठी माहिती देणार व्यक्ती नियुक्त केला जातो.