महसूल मंत्री एकनाथ खडसे यांची माहितीनागपूर : महाराष्ट्र वक्फ मंडळाची पुनर्रचना करून मंडळातील रिक्तपदे भरण्याची कार्यवाही तीन महिन्यात केली जाईल, अशी माहिती अल्पसंख्यक विकास मंत्री एकनाथ खडसे यांनी सोमवारी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.मंडळावर अध्यक्षाची नेमणूक तसेच कर्मचाऱ्यांबाबत विधी व न्याय विभागाकडे अभिप्राय मागविण्यात आले होते. त्यानुसार रिक्तपदे भरण्यात येतील. वक्फ मंडळाच्या जागेवरील अतिक्रमणे काढण्याची कारवाई करून याच्या संगणीकृत नोदी केल्या जातील, असे त्यांनी सांगितले.सदस्य अब्दुल्ला खान दुर्राणी यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. चर्चेत सदस्य सुनील तटकरे, हुस्नबानू खलिफे आदींनी सहभाग घेतला.पीक विमा योजना सर्वत्र लागू करणारहवामानावर आधारित फळ पीक विमा योजना सिंधुदूर्ग, रायगड, रत्नागिरी यासह सहा जिल्ह्यात लागू करण्यात आली आहे. मागणीनुसार ती राज्यात सर्वत्र लागू करण्यात येईल, असे कृ षी,फलोत्पादन मंत्री एकनाथ खडसे यांनी सोमवारी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले. सिंधुदूर्ग जिल्ह्यात आंबा पिकासाठी ही योजना राबविण्यात आली. त्यानंतर इतर पाच जिल्ह्यात राबविण्यात आली. नाशिक व इतर काही जिल्ह्यात द्राक्ष, केळी, डाळींब आदी पिकासाठी लागू करण्यात आली. ही योजना संत्रा पिकासाठी लागू करण्याची मागणी आहे. त्यानुसार या पिकालाही ही योजना लागू क रणार असल्याचे त्यांनी सांगितले.सिंधुदूर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याबाबतचा प्रश्न सुनील तटकरे यांनी उपस्थित के ला होता. तलाठ्यांची ३०८४ पदे भरणारराज्यात सज्जासह तलाठ्यांची पदे निर्माण करण्याची शिफारस नागपूर विभागाचे आयुक्त यांच्या समितीने केली आहे. त्यानुसार ३०८४ पदे नव्याने निर्माण करून ती भरण्यात येतील अशी माहिती महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी सोमवारी विधानपरिषदेत प्रश्नाच्या उत्तरात दिली.नवीन तलाठी व सज्जांना अत्याधुनिक साधने उपलब्ध करण्याचा सरकारचा मानस आहे. १ एप्रिल २०१४ पूर्वी आवश्यक पदांना मान्यता घेतली जाईल. असेही ते म्हणाले.अमरसिंह पंडित यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता.नाशिक येथे औद्योगिक प्रदर्शन केंद्र नाशिक येथे कायमस्वरूपी औद्योगिक प्रदर्शन केंद्र सुरू करण्याचा सरकारचा मानस असल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सोमवारी विधानपरिषदेत प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.एमआयडीसी येथे जागा उपलब्ध होऊ शकते का, याची माहिती घेण्यात येईल. नाशिक येथे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व व्यापारी केंद्र विकसित करण्याकरिता नाशिक इंडस्ट्रीयल मॅन्युफॅक्चंिरंग असोसिएशन यांनी ३६८ क ोटींचा प्रस्ताव दिला होता. परंतु तो जास्त असल्याने सुधारित प्रस्ताव द्यावा, असे त्यांना कळविण्यात आले आहे. या संदर्भात महापालिका, निफाड पंचायत समिती व शासन यांची बैठक घेऊ न योग्य निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. सदस्य जयवंतराव जाधव यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. हेमंत टकले यांनी या चर्चेत सहभाग घेतला.एमआरटीपी कायद्यात दुरुस्ती पुणे जिल्ह्यातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याच्या अनुषंगाने दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेच्या सुनावणीत उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अतिक्रमण काढून एमआरटीपी कायद्यात दुरुस्ती केली जाणार आहे, अशी माहिती महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी सोमवारी विधानपरिषदेत प्रश्नाच्या उत्तरात दिली.दुरूस्तीसंदर्भात विधेयक मांडण्यात आले आहे. ते मंजूर झाल्यानंतर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. पुणे महापालिका हद्दीतील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याबाबतचा प्रश्न सदस्य दीप्ती चौधरी यांनी उपस्थित केला होता.अनधिकृत बांधकामावर कारवाई होऊ नये यासाठी काही वेळा लोकप्रतिनिधी मध्यस्थी करतात. ती त्यांनी करू नये यासाठी व अतिक्रमण करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबत कायद्यात बदल करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. चर्चेत शरद रणपिसे यांनी उपप्रश्न विचारला होता.अवैध रेती उपशाच्या २१२ प्रकरणात कारवाईयवतमाळ जिल्ह्यातील अवैध रेती उपशाच्या २१२ प्रकरणात कारवाई करून १६.६५ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच सहा प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी सोमवारी विधानपरिषदेत प्रश्नाच्या उत्तरात दिली.अवैध उत्खनन रोखण्यासाठी जिल्ह्यात भरारी पथके गठित करण्यात ंआली आहेत. अवैध रेती उपशाला आळा घालण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कार्यवाही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. हरिसिंग राठोड यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. (प्रतिनिधी)
वक्फ मंडळातील रिक्तपदे भरणार
By admin | Published: December 22, 2014 11:49 PM