शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
2
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
3
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
4
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
5
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
6
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
7
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
8
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
9
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
10
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
11
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
12
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
13
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
14
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
15
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
16
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
17
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
18
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
19
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
20
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला

‘वक्फ’ जमिनीचे व्यवहार बेकायदा

By admin | Published: May 12, 2016 3:26 AM

सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही मुंबईच्या धर्मादाय आयुक्तांनी वक्फ बोर्डाच्या मालकीच्या मुंबईतील नऊ जागा १०७ कोटी ५५ लाख एवढ्या नाममात्र दराने विकल्याची माहिती समोर आली आहे

अतुल कुलकर्णी,  मुंबईसर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही मुंबईच्या धर्मादाय आयुक्तांनी वक्फ बोर्डाच्या मालकीच्या मुंबईतील नऊ जागा १०७ कोटी ५५ लाख एवढ्या नाममात्र दराने विकल्याची माहिती समोर आली आहे. असे एकूण ७० व्यवहार एकट्या मुंबईत झाले आहेत. हे सगळे विक्री व्यवहार आणि लीज परवानग्या बेकायदेशीर ठरविण्याचे आदेश अल्पसंख्याक विभागाचे मंत्री एकनाथ खडसे यांनी दिले आहेत. ज्या नऊ बेकायदा व्यवहारांची माहिती समोर आली आहे़ त्यातील आठ व्यवहार युती सरकारच्या काळातील आहेत. राज्यातील वक्फच्या सगळ्या जमिनींच्या सातबाऱ्यावर ‘वक्फ प्रतिबंधित सत्ताप्रकार’ अशी नोंद करण्याचे काम तातडीने सुरू करा. त्यासाठी १३ एप्रिल रोजी काढलेल्या आदेशाचे तातडीने पालन करा, असेही खडसे यांनी बजावले आहे. ज्या धर्मादाय आयुक्तांनी हे असे व्यवहार केले आहेत त्यांच्यावर विधी व न्याय विभागातर्फे तातडीने कारवाई करण्यात यावी, असे सचिवांना सांगितल्याचे खडसे लोकमतला सांगितले.या विक्री व्यवहाराने सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान झाला असून, धर्मादाय आयुक्तांविरुद्ध कंटेमप्ट प्रोसेडिंग दाखल करण्याचे आदेशही खडसे यांनी दिले आहेत. ११ मे २०१२ च्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वक्फ बोर्डाच्या ताब्यात असणारी जमीन विकता येत नाही किंवा ती लीजवरही देता येत नाही. मात्र वक्फ बोर्डाच्या कारभारात प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचे समोर आल्यानंतर निवृत्त न्यायमूर्ती शेख यांची चौकशी समिती नेमली गेली. मंत्री खडसे यांनी या अहवालावर आधारित उपाययोजनांसाठी बैठक बोलावली तेव्हा यातील काही नावे समोर आली आहेत. सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही मुंबईतल्या वक्फच्या मालकीच्या ७० जमिनी विकल्या गेल्या. काही जमिनी म्हाडा, सिडको, महापालिका आणि खासगी व्यक्ती अथवा संस्थांना हस्तांतरीतही केल्या. त्यातल्या काही जमिनींवर मुंबईतल्या बिल्डरांनी पुनर्विकासाचे प्रस्तावही सादर केले. पालिकेने त्यांना मान्यता दिली एवढेच नाही तर काही प्रस्ताव राज्य सरकारकडे आले व राज्य सरकारनेही त्या प्रस्तावांना माहिती दिल्याचे अहवालातून समोर आल्याचे खडसे यांनी सांगितले.धर्मादाय आयुक्तांच्या विरोधात सर्वाेच्च न्यायालयात कंटेम्प्ट प्रोसेडिंग दाखल करा.सर्व विश्वस्त व वक्फच्या जमिनी विकत घेणारे व त्यात सहभागी असणाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस काढणार.धर्मादाय आयुक्तांना नोटिसा देऊन वक्फ मिळकती किंवा वक्फ प्रकरणात हस्तक्षेप करू नये व वक्फ मिळकतीच्या रेकॉर्डमध्ये कोणत्याही प्रकारचे बदल करू नयेत.महसूल विभाग व दुय्यम निबंधक कार्यालयाला निर्देश देऊन वक्फ मिळकतीसंबंधी धर्मादाय आयुक्तांनी दिलेल्या कोणत्याही आदेशाची अंमलबजावणी न करता वक्फ बोर्डाच्या परवानगीशिवाय मालमत्तांमध्ये कोणतेही बदल किंवा नोंदणी अथवा खरेदी विक्री करू नये.>हे आहेत मुंबईतले नऊ खरेदीदारनावरक्कम (लाखात)आदेशाची तारीखहार्ड रॉक प्रॉपर्टीज प्रा. लि.५२.००२८-०८-२०१४सैफी बुरानी अपलिफ्टमेंट ट्रस्ट११०.००२६-११-२०१५सैफी बुरानी अपलिफ्टमेंट ट्रस्ट६००.००२६-११-२०१५सैफी बुरानी अपलिफ्टमेंट ट्रस्ट१००.००२६-११-२०१५ग्लोबल टेक पार्क प्रा. लि.९२००.००२३-११-२०१५मे. सावंत बिल्डर्स अ‍ॅन्ड डेव्हलपर्स१५०.००१७-०४-२०१५एम.जे. बिल्डर्स, मुंबई२०.५११०-०८-२०१५क्रेआॅन्स प्रापर्टीज डिझायनर प्रा. लि. ४५०.००२५-०८-२०१५प्रियाली बिल्डर्स अ‍ॅन्ड डेव्हलपर्स, मुंबई७३.१६०४-०४-२०१५