कांजूर येथील प्रकार : मिथेन वायूमुळे आठ जण गुदमरले, पाच जणांची सुटका
मुंबई : कांजूर येथे पूर्व द्रुतगती महामार्गालगत नाल्याजवळील मलनिस्सारण वाहिनीच्या (ड्रेनेज लाईन) सफाईचे काम सुरू असताना चेंबरमधील मिथेन वायूमुळे तिघा सफाई कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला. याप्रकरणी कांजूर पोलिसांनी ठेकेदार शिवानंद चव्हाण याला अटक केली आहे. मुंबईतील जुन्या मलनिस्सारण वाहिनीच्या सफाई, दुरुस्तीचे काम श्रीराम ईपीसी लिमिटेड या खाजगी कंपनीकडे देण्यात आले आहे. शनिवारी मध्यरात्री पूर्व द्रुतगती महामार्गालगतच्या जुन्या मलनिस्सारण वाहिनीची सफाई तसेच त्याचा नवीन वॉल बसविण्याचे काम सुरू होते. त्यासाठी ठेकेदाराने आठ कामगारांना चेंबरमध्ये उतरवले होते. ३० फूट खोल आणि १०० ते १५० फूट रुंद चेंबरच्या तळाशी मिथेन गॅसच्या अतिरिक्त प्रमाणामुळे कामगारांना गुदमरल्यासारखे झाले. त्यामुळे पाच जण बाहेर पडले, तर तिघे जण आतच अडकून राहिले. परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे पाहून पहाटे तीन वाजता अग्निशमन दलाच्या अधिकाºयांना बोलावून बचावकार्यास सुरुवात झाली. सकाळी सातच्या सुमारास अग्निशमन दलाने तिघा कामगारांना बाहेर काढले. मात्र त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मुलुंड अग्निशमन दलाचे वरिष्ठ अधिकारी व्ही. एम. माईणकर यांनी दिली. समीर प्रधान (३२), राजेश कुमार विस्वान (४७), धनेश्वर स्वाइन (३०) अशी मृत कामगारांची नावे असून, तिघेही भांडुप (पूर्व) येथील राहणारे होते. दुपारी तीनच्या सुमारास तिघांंचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठविण्यात आले. ठेकेदार शिवानंद चव्हाण याच्या विरोधात पोलिसांनी हलगर्जीचा गुन्हा दाखल केला आहे. ठेकेदाराची हलगर्जी नडली च्महापालिका मलनिस्सारण विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील सरदार यांनी सांगितले, की शनिवारी रात्री ८ वाजेपर्यंत महापालिका अधिकाºयांसमवेत चेंबरमध्ये काम सुरू होते. चेंबरच्या तळाकडे जाण्यासाठी लागणारी भिंत तात्पुरत्या गोणीने उभारली होती. च्ती पूर्णपणे ढासळल्याने त्यातून आत जाणे शक्य नव्हते. रविवारी सकाळी ती भिंत काढल्यानंतर काम सुरू झाले. मात्र मध्यरात्री ठेकेदाराने कामगारांना सुरक्षेशिवाय आत उतरविले. ड्रेनेजलाइन जुनी असल्याने मिथेन वायू साचलेला होता. त्यामुळेच कामगार गुदमरले. च्मुळात अशी कामे करताना चेंबरमध्ये गॅसमीटरने आतील आॅक्सिजनची मात्राही तपासली जाते. तसेच कामगारांना सेफ्टी बेल्ट, मास्कची व्यवस्थाही करणे अत्यावश्यक असल्याचे अधिकाºयाने सांगितले. मात्र या घटनेत योग्य खबरदारी घेतली नसल्याने कामगारांंचे मृत्यू ओढवल्याचे प्राथमिक तपासात दिसते.